डोनट्स | Donuts Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Donuts recipe in Marathi,डोनट्स, seema Nadkarni
डोनट्सby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    59

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

डोनट्स recipe

डोनट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Donuts Recipe in Marathi )

  • 1/2 कप मैदा
  • 1/2 कप गव्हाचे पीठ
  • 1/2 टी स्पून मीठ
  • 1 चमचा यीस्ट
  • 2 चमचा साखर
  • 1/2 कप दूध
  • 2-3 चमचा बटर किंवा तेल
  • 2 चमचा मिल्क पावडर
  • 1/4 टि स्पून बेकिंग पावडर
  • तळण्यासाठी तेल
  • कोको पावडर 4 चमचा
  • 2-3 चमचा दूध
  • 2 चमचा साखर
  • 1 चमचा बटर
  • डेकोरेशन साठी गोळ्या बारीक

डोनट्स | How to make Donuts Recipe in Marathi

  1. 1/2 कप दूध कोमट करून घ्या, त्यात 2 चमचा साखर आणि यीस्ट टाकून एकत्र करून 10 मिनिटे बाजूला ठेवावे. फरमेन्ट व्हायला.
  2. एका भांड्यात मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र त्यात मीठ, बेकिंग पावडर, मिल्क पावडर घालून घ्या.
  3. यीस्ट फरमेन्ट झाले कि ते वरील पीठा च्या मिश्रणात घालून पीठ मळून घ्यावे.
  4. हे पीठ थोडे चीकट होईल, पीठा ला तेलाचा हात लावून प्लेटफोम वर चांगले 10 - 15 मिनिटे मळून घ्या.
  5. मळून घेतल्या वर चीकट पणा राहणार नाही. ह्या पीठा च्या गोळ्या ला तेलाचा हात लावून बाऊल मध्ये ठेवून दिड तास गरम जागेवर झाकून ठेवावे
  6. दिड तास नी हे पीठ डबल फूगून जाईल.
  7. ह्या पीठा ची थोडे थोडे दाबून घ्यावे.
  8. किचन प्लेटफोम वर मैदा लावून पोळी सारखे लाटून घ्या. त्याचे डोनट्स च्या आकाराचे कापून एका ताटात ठेवून. :doughnut:
  9. 15-20 मिनिटे झाकून ठेवावे. की ते डबल होतील.
  10. तेल गरम करुन त्यात हे डोनट्स तळून घ्या. किंवा बेकिंग ट्रे मध्ये ठेवून बेक करून घ्या.
  11. डोनट्स थंड होतील तो पर्यंत चोकलेट सोँस तयार करून घ्या
  12. कोको पावडर मध्ये पीठी साखर मिक्स करून घ्या. त्यात थोडे बटर टाकून कोमट दूध घालून एकत्र करून घ्यावे.
  13. या मिश्रणात तयार केलेले डोनट्स बुडवून त्या वर डेकोरेशन साठी छोट्या छोट्या गोळ्या लावून फ्रिज मध्ये 5 मिनिटे ठेवून. मगच सर्व करावे.

My Tip:

पीठ डबल फूगून जाईल तेव्हा च त्याची पोळी लाटावी. डोनट्स चे आकार कटर नसल्यास स्टिल च्या डब्याचे झाकण वापरावे.

Reviews for Donuts Recipe in Marathi (0)