मक्याचा पीठ मेथी ठेपला | Makyacha pith Methi thepla Recipe in Marathi

प्रेषक safiya abdurrahman khan  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Makyacha pith Methi thepla recipe in Marathi,मक्याचा पीठ मेथी ठेपला, safiya abdurrahman khan
मक्याचा पीठ मेथी ठेपलाby safiya abdurrahman khan
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

मक्याचा पीठ मेथी ठेपला recipe

मक्याचा पीठ मेथी ठेपला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Makyacha pith Methi thepla Recipe in Marathi )

  • बारीक चिरलिली मेथीची पाने 2कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर 1/4 कप
  • मक्याचा पीठ 2 कप
  • गव्हाचे पीठ 1/2 कप
  • तांदळाचे पीठ 1/4 कप
  • दही 1टेबल स्पून
  • हिरवी मिरची 1 टीस्पून
  • आले -लसूण पेस्ट 1 टीस्पुन
  • हळद 1/2 टीस्पुन
  • मीठ चवीनुसार
  • तेल कींवा तुप चवीनुसार

मक्याचा पीठ मेथी ठेपला | How to make Makyacha pith Methi thepla Recipe in Marathi

  1. मेथीच्या पाने आणि थोडे मीठ एकत्र हलवून १० मिनिटे बाजूला ठेवा.
  2. नंतर त्यामधे बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र हलवा. त्यामधे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या.
  3. शेवटी थोडे तेल घालून मळून घ्या आणि हे कणीक अर्धा तास तरी बाजूला तसेच ठेवा.
  4. नंतर त्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून ठेवा. गॅस वर एक तवा गरम करायला ठेवा.
  5. प्रत्येक गोळ्या चे ठेपला लाटा. थेपला दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या.
  6. ठेपला भाजताना थोडे तूप किंवा तेल लावा.
  7. गरमागरम ठेपला कोणत्याही चटणी किंवा लोणचे किंवा दही बरोबर छान लागतो.

Reviews for Makyacha pith Methi thepla Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती