शेवई उपमा | Nudal Upma Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Nudal Upma recipe in Marathi,शेवई उपमा, Maya Ghuse
शेवई उपमाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

शेवई उपमा recipe

शेवई उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nudal Upma Recipe in Marathi )

  • बारीक शेवई 2वाटी
  • कांदा 1
  • हिरवी मिरची 3-4
  • शिमला मिरची 1
  • हिरवे वाटाणे
  • टमाटे 3-4
  • जिरं अर्धा चमचा
  • मोहरी चिमूटभर
  • तेल 4 चमचे
  • हळदं पाव चमचा
  • धना पावडर पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • लिंबूरस 1 चमचा

शेवई उपमा | How to make Nudal Upma Recipe in Marathi

  1. कढईत 1 चमचा तेल टाकून त्यात शेवया भाजून घेतल्या बाजूला काढून ठेवल्या
  2. आता कढईत तेल तापवून जिरं मोहरी टाकली कांदा चिरून टाकला, हिरवी मिरची शिमला मिरची चिरून टाकली, हळदं, धना पावडर, टमाटे बारीक चिरून घातले,मीठ घातले.
  3. भाजलेल्या शेवया टाकून झाकण घातले 2-3 वेळा खोरून घेतले ,कोथिंबीर घातली
  4. लिंबाचा रस टाकून डब्यात दिला

My Tip:

टमाट्याच्या रश्यात शेवया चांगल्या शिजल्यावर चव छान येते

Reviews for Nudal Upma Recipe in Marathi (0)