बटाटा रोल चाट | Batata roll chat Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Batata roll chat recipe in Marathi,बटाटा रोल चाट, Sapna Asawa Kabra
बटाटा रोल चाटby Sapna Asawa Kabra
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

6

0

बटाटा रोल चाट recipe

बटाटा रोल चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata roll chat Recipe in Marathi )

  • बटाटा रोल चे साहित्य
  • उकडलेले बटाटे 2 लहान
  • राजगिरा पीठ 2 मोठे चमचे
  • लाल तिखट 1 टि स्पून
  • मीठ स्वादानुसार
  • चाट चे साहित्य
  • दही 2 मोठे चमचे
  • हिरवी चटणी 2 चमचे
  • खजुर-गूळ ची चटणी 2 चमचे
  • लाल तिखट चवीनुसार
  • जिरा पावडर चवीनुसार
  • मिठ स्वादानुसार
  • उपवासाचा चिवडा
  • कोथिंबीर

बटाटा रोल चाट | How to make Batata roll chat Recipe in Marathi

  1. एका भांड्यात उकडलेले बटाटे, राजगिरा पीठ, लाल तिखट व स्वादानुसार मीठ घालून चांगले पिठ मळून घ्यावे
  2. तयार पीठाचे पोळी लाटावि
  3. आता चाकूने त्या पोळीचे समान पट्या कापावे
  4. प्रत्येक पट्टी चे रोल करावे
  5. कढईत तूप गरम करून त्यात तयार रोल चांगले तळून घ्यावे
  6. आता एका सरविंग डिश मध्ये रोल काढून घ्यावे
  7. त्यावर दही, हिरवी चटणी, खजुर ची चटणी टाका़वी
  8. वरून लाल तिखट, जिरे पूड व स्वादानुसार मीठ टाकून त्यावर उपवासाचा चिवडा व कोथिंबीर टाकावी

Reviews for Batata roll chat Recipe in Marathi (0)