मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसे | Mix flour Anarase Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mix flour Anarase recipe in Marathi,मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसे, Bharti Kharote
मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसेby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    35

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

3

0

मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसे recipe

मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix flour Anarase Recipe in Marathi )

  • एक वाटी वरईच पीठ
  • एक वाटी साबुदाणा पीठ
  • एक वाटी राजगिरा पीठ
  • एक चमचा आंबट दही
  • एक वाटी गुळ आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. .
  • तळण्यासाठी तेल /तूप

मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसे | How to make Mix flour Anarase Recipe in Marathi

  1. एक वाटी वरईच पीठ एक वाटी साबुदाणा पीठ आणि अर्धी वाटी राजगिरा पीठ एका वाडग्यात घ्या. .
  2. अर्धी वाटी राजगिरा पीठ तसंच राहू दया. .बाकीच्या पीठात गुळ आणि दही घाला. .
  3. पीठ हाताने मिक्स करून घ्या. 15 मी बाजूला ठेवा. .
  4. आता जर पीठ पातळ वाटत असेल तर त्यात आधीच काढून ठेवलेले राजगिरा पीठ घालून चांगल मळून घ्या. .तेलाचा हात लावून छोटे गोळे बनवा.
  5. डीश मध्ये वरईचा रवा घ्या. त्या वर एका बाजूने अनारसे थापून घ्या. ..
  6. कढई गॅस वर ठेवून थोडे तेल तापत ठेवा. .
  7. त्यात रवा लावलेला भाग वरती राहिल अशा पध्दतीने तेलात अनारसा सोडा. .
  8. झारयाने वरच्या बाजूवर तेल टाका. .पलटी मारू नये..
  9. असेच सर्व अनारसे तळून घ्या. .
  10. आणि गरम गरम सर्व्ह करा. .मस्त कुरकुरीत झालेत...

My Tip:

तळतांना मंद आचेवर तळावेत जळत नाहीत. .

Reviews for Mix flour Anarase Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo