Upavasa chi aalu vadi | Aalu vadi Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Aalu vadi recipe in Marathi,Upavasa chi aalu vadi, seema Nadkarni
Upavasa chi aalu vadiby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    25

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

Upavasa chi aalu vadi recipe

Upavasa chi aalu vadi बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aalu vadi Recipe in Marathi )

  • 8-10 आलू ची पान
  • 2 कप राजगिय्याचे पीठ
  • 1 कप चींचे च पाणी
  • चवी पुरते मीठ
  • 2 चमचा मिरची आणि कोथिंबीर ची चटणी
  • 1 टी स्पून साखर
  • 1 टी स्पून लाल तिखट
  • 1 चमचा जिरे
  • थोडा कडीपत्ता
  • फोडणी साठी तेल

Upavasa chi aalu vadi | How to make Aalu vadi Recipe in Marathi

  1. सवॅ प्रथम आलू ची पान स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची शीरा काढून घ्या.
  2. चींचे च्या पाण्यात राजगिय्याचे पीठ, मीठ, लाल तिखट, साखर, मिरची आणि कोथिंबीर ची चटणी, एकत्रित करून थोडे जाडसर मिश्रण तयार करून घ्या.
  3. एका मोठ्या पातेल्यात किंवा ढोकळा च्या पात्रात पाणी घालून झाकण ठेवून गरम करायला ठेवा.
  4. आलू ची एक पान घेऊन त्यावर पीठा चे मिश्रण हाताने पसरवून घ्या. त्यावर दूसरे पान ठेवून परत त्यावर पीठा चे मिश्रण लावावे, अश्या प्रकारे सगळे पानावरून करून एका वर एक पान ठेवून करावे.
  5. एका वर एक पान ठेवून शेवटी त्याचे घट्ट रोल करून चाळणीत ठेवून गरम पाण्यात ठेवून वाफेवर शिजवून घ्यावे.
  6. थंड झाल्यावर त्याच्या चकत्या करुन घ्या.
  7. कढई तेल घालून जीरे व कडीपत्ता घालून फोडणी करून त्यात ह्या वड्या टाकून एकत्र करून घ्यावे.
  8. वरून कोथिंबीर घालून सवँ करावे.

Reviews for Aalu vadi Recipe in Marathi (0)