कचोरी | Kachori Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kachori recipe in Marathi,कचोरी, Sharwari Vyavhare
कचोरीby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

कचोरी recipe

कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kachori Recipe in Marathi )

  • मोठी उकडलेली बटाटे 6 ते 7
  • भगरीचे पिठ मध्यम आकाराचे 8 ते 9 चमचे
  • बारीक खिसलेले ओले खोबरे १ / २ वाटी
  • हिरवी मिरची १० ते १२
  • शाबुदाणा १ कप
  • सेंधव मिठ चवीप्रमाणे
  • तेल तळण्यासाठी

कचोरी | How to make Kachori Recipe in Marathi

  1. शाबुदाणा भगरी पेक्षा थोडा जाड असा मिक्सर मधून काढून घ्या
  2. खोबरे, हिरवी मिरची , मिठ मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  3. बटाटे खिसुन घ्या. या मध्ये भगरीचे पिठ व मिठ मिक्स करा
  4. याचे मध्यम आकाराचे गोळे बनवा
  5. खोबऱ्याच्या मिश्रणाचे लहान गोळे बनवा
  6. बटाट्याच्या गोळ्याची पारी करा. त्या मध्ये खोबऱ्याचा गोळा घालून कचोरी चा आकार दया
  7. कचोरी शाबुदाण्या मध्ये घोळवा
  8. कढईत कडकडीत तेल गरम करा .
  9. मध्यम गैस वर कचोरी तळा

My Tip:

बटाटे पुर्ण पणे थंड झाल्या वर वापरात आणा. बटाटे कितीओलसर आहेत त्या प्रमाणे भगरीचे पिठ कमी जास्त करावे.

Reviews for Kachori Recipe in Marathi (0)