सोलकढी | Solkadhi Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Solkadhi recipe in Marathi,सोलकढी, Teju Auti
सोलकढीby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

सोलकढी recipe

सोलकढी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Solkadhi Recipe in Marathi )

  • १ खवलेला नारळ
  • ४-५ लसून पाकळ्या
  • ७-८ सुकी आमसूल
  • १-२ हिरवी मिरची
  • जीर पूड
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर

सोलकढी | How to make Solkadhi Recipe in Marathi

  1. प्रथम ५-६ आमसूल १ १/२ कप गरम पाण्यात २५-३० मिनिटे भिजत ठेवून नंतर त्याला कुस्करून ते पाणी गाळून कोकम रस करून घ्या.
  2. खवलेला नारळ, मिरची, लसून आणि चवीपुरते मीठ मिक्सर मधून वाटून घ्या. मग त्या मिश्रणाला २ कप पाणी टाकून चाळणीने गाळून घ्या. पुन्हा त्यात २ कप पाणी टाकून गाळून घ्या.
  3. त्यात आता दूध आणि वरील कोकम रस टाकून ढवळा आणि थंड करणास फ्रीज मध्ये ठेवा.
  4. सर्व्ह करताना कोथिबीर टाका आणि जीर पूड टाका.

My Tip:

जीर पूड सर्व्ह करताना टाका, नाही तर सोल कढीचा रंग बदलेल.

Reviews for Solkadhi Recipe in Marathi (0)