मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाचे बेक्ड मोदक

Photo of Baked Coconut Modak by archana chaudhari at BetterButter
580
4
0.0(0)
0

नारळाचे बेक्ड मोदक

Aug-31-2018
archana chaudhari
30 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाचे बेक्ड मोदक कृती बद्दल

गणपतीला आवडणारे हे हेल्दी मोदक तुम्ही देखील नक्की बनवून बघा.

रेसपी टैग

  • मध्यम
  • बेकिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. कव्हरसाठी
  2. गव्हाचे पीठ २ १/२ कप(अडीच कप)
  3. तेल १/४ कप
  4. मीठ १ टीस्पून
  5. सारणासाठी
  6. नारळाचा किस ३ कप
  7. गूळ १ १/२(दीड कप)
  8. विलायची पावडर १/२ टीस्पून
  9. केशर च्या दांड्या ८

सूचना

  1. गव्हाच्या पिठात मीठ आणि तेल टाकून एकत्र करून घ्या.
  2. पाणी घालून घट्ट मळून घ्या.
  3. वरील भिजवलेला गोळा १० मिनिटे झाकून ठेवा.
  4. आता कढईत २टेबलस्पून पाणी टाका.
  5. पाण्यामध्ये गूळ टाकून ढवळत रहा.
  6. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर त्यात नारळाचा किस टाका.
  7. मध्यम आचेवर गूळ आणि नारळाचा किस सतत हलवत रहा.
  8. विलायची पावडर आणि केशर टाका.
  9. मिश्रणाचा गोळा झाला की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.
  10. गव्हाच्या पिठाचा थोडा गोळा जाडसर लाटून घ्या.
  11. गोल वाटीच्या साहाय्याने लहान पुरीचे आकार बनून घ्या.
  12. एक पुरी हातावर ठेवून त्यात सारण ठेवून मोदक बनवा.
  13. याप्रमाणे सगळे मोदक बनवून घ्या.ताटावर बटर पेपर ठेवून त्यावर मोदक ठेवा.
  14. ओव्हन १८० अंश सेंटिग्रेड ला तापत ठेवा.
  15. मोदकचे ताट ओव्हन मध्ये रॅक वर ठेवून १८० अंश सेंटिग्रेड ला २० मिनिटे बेक करा.
  16. बाप्पांसाठी छान हेल्दी मोदक तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर