मुख्यपृष्ठ / पाककृती / Vaatlya Daliche Ladoo (Ground Chana Dal Ladoo)

Photo of Vaatlya Daliche Ladoo (Ground Chana Dal Ladoo) by Sanika SN at BetterButter
1353
4
0.0(1)
0

Vaatlya Daliche Ladoo (Ground Chana Dal Ladoo)

Sep-09-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ वाट्या भिजवलेली चणा डाळ
  2. ३-१/२ वाट्या साखर
  3. दीड वाट्या पाणी
  4. १ वाटी साजूक तूप
  5. १/४ वाटी दूध
  6. १ टीस्पून वेलचीपूड
  7. १/४ टीस्पून केशर
  8. बेदाणे+बदाम्+पिस्त्याचे काप सजावटीसाठी

सूचना

  1. साहित्य
  2. भिजवलेली चणाडाळ मिक्सरवर कमीत-कमी पाणी घालून वाटून घ्यावी.
  3. नॉन-स्टीक कढईमध्ये तुपावर वाटलेली डाळ मंद आचेवर परतायला घ्यावी.
  4. डाळ सतत परतत रहावी म्हणजे कढईला तळाला चिकटणार नाही.
  5. आधी डाळ गोळा होऊ लागेल , वाटल्यास आणखीन थोडे तूप घालावे.
  6. हळू-हळू डाळ हलकी सोनेरी होऊ लागेल.
  7. साधारण तासभर परतल्यावर डाळ मोकळी होऊ लागेल.
  8. खमंग भाजल्यावर एका ताटात काढून घ्यावी.
  9. वेगळ्या भांड्यात साखर+पाणी+केशर एकत्र करून दोन तारी पाक तयार करावा.
  10. पाक तयार झाला की त्यात दूध, सुकामेवा व वेलचीपूड घालून एकत्र करावे.
  11. हा पाक डाळीच्या मिश्रणात घालून एकत्र करावा.
  12. २-३ तास पाक चांगला मुरला व मिश्रण लाडू वळण्यास योग्य झाले की लाडू वळवून्/बांधून घ्यावे.
  13. पाक छान मुरला की लाडू चवीला रुचकर लागतात.
  14. तयार लाडू.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Deepa Gad
Sep-09-2018
Deepa Gad   Sep-09-2018

खूप छान

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर