मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठाच्या करंज्या

Photo of Pithachya Karanjya by Deepa Gad at BetterButter
1395
2
0.0(0)
0

पिठाच्या करंज्या

Sep-12-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठाच्या करंज्या कृती बद्दल

या करंज्या प्रामुख्याने कोकणात गणेश चतुर्थीत करतात, भजनकरी मंडळी तर या करंज्या कधी खायला मिळतात त्याची वाटच बघत असतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 10

  1. अर्धा किलो चणाडाळ
  2. अर्धा किलो गुळ
  3. तूप १ वाटी बेसन भाजण्यासाठी
  4. पाव किलो मैदा
  5. १०० ग्राम सुकं खोबरं
  6. मीठ चवीपुरते
  7. वेलचीपूड
  8. तुपाचे मोहन २ च
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मैद्यात तुपाचे मोहन घालून मीठ घाला, हाताने एकजीव करा
  2. थोडं थोडं पाणी घालून मळा
  3. ओल्या कपड्याने एक तास झाकुन ठेवा
  4. चणाडाळ तव्यावर थोडी भाजून घ्या व मिक्सरवर बारीक करून चाळुन घ्या
  5. बेसनात तूप थोडे घालून खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या
  6. भाजलेल बेसन थंड झालं की गुळ चिरून घाला
  7. सुकं खोबरं किसून थोडं भाजून घ्या
  8. बेसन गुळ मिश्रणात वेलचीपूड घालून मिक्सरवर थोडंसंच फिरवा म्हणजे गुळ व्यवस्थित बेसनात मिक्स होईल
  9. भाजलेले सुकं खोबरं मिक्स करा, हे झालं आपलं सारण तयार
  10. मैद्याच्या पिठाच्या पाऱ्या लाटून घ्या त्यात सारण भरून करंजी बनवा
  11. तेलात तळा, मस्त खुसखुशीत करंज्या तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर