मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबोळी आणि काळे वाटाणे सांबार

Photo of aamboli ani kaale vatane sambar by supriya padave (krupa rane) at BetterButter
1083
3
0.0(0)
0

आंबोळी आणि काळे वाटाणे सांबार

Sep-15-2018
supriya padave (krupa rane)
840 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबोळी आणि काळे वाटाणे सांबार कृती बद्दल

पारंपरिक मालवणी पदार्थ , कुठल्याही कार्यात आवर्जून हे सांबर केले जाते तसेच त्याच्या जोड़ीला वड़े किंवा आंबोळी बनविलि जाते हे कॉम्बिनेशन अतिशय रुचकर लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. आंबोळी साठी साहित्य
  2. दोन वाटी तांदूळ
  3. अर्धा वाटी उड़ीद डाळ
  4. एक वाटी जाड़े पोहे
  5. अर्धा टेबल स्पून मेथी दाणे
  6. मीठ चवी प्रमाणे
  7. तेल
  8. सांबर बनविण्या साठी
  9. अर्धा वाटी काळे वाटाणे
  10. अर्धा वाटी किसलेले सुके खोबरे
  11. एक कांदा उभा चिरुंन
  12. अर्धा कांदा बारीक चिरुन
  13. सात ते आठ कड़ी पत्ता पाने
  14. एक चमचा आले लसुन पेस्ट
  15. दोन चमचे मालवणी मसाला
  16. पाव चमचा गरम मसाला
  17. मीठ
  18. तेल दोन चमचे

सूचना

  1. आंबोळी बनविन्या ची कृती
  2. उडिद डाळ व् तांदूळ दोन्ही स्वछ धुवून वेगवेगले पाण्यात भिजत घालावेत , तांदुल बरोबर मेथी दाणे सुद्धा भिजत घालावेत हे सर्व सहा ते सात तास भिजले पाहिजेत .पोहे फक्त 15 ते 20 मिनिट पाण्यात भिजले तरी चालतील
  3. आता सर्व वेगवेगळे मिक्सरला बारीक वाटून घ्या पीठ वाटताना फार पाणी टाकू नका हे पीठ ferment होण्यासाठी एका टोपात जाकुन 8 ते 9 तास ठेवून दया
  4. 8 ते 9 तासा नंतर हे पीठ छान फुलुंन वर आले असेल आता हयात मीठ टाकून चांगले एक्जीव करुन घ्या व् बीड़ा च्या तव्यावर किंवा डोसा तवा वर हयाच्या आम्बोळी बनवुन् घ्या
  5. दोन्ही बाजूने भाजूंन घ्या
  6. काळे वाटाणे सांबर
  7. काळे वाटाने सात ते आठ तास पाण्यात भिजत घाला व् नंतर कुकरला मीठ व् थोडा खान्याचा सोडा टाकून चार ते पाच शिट्या करुन शिजवून घ्या
  8. आता ह्यातले थोड़े काले वाटणे मिक्सरला बारीक वाटून घ्या ह्यामुळे साबरला चांगली चव येईल
  9. कांदा व् खोबरे वेगवेगळे तेलात लालसर रंगावर भाजुन घ्या व् ठंड जल्यावर पेस्ट करुन घ्या ,अर्धा कांदा बारीक़ चिरून घ्या
  10. टोपात दोन चमचे तेल तापत ठेवा व् त्या नंतर त्यात कांदा व् कदीपत्ता , मालवणी मसाला टाकून परतवा आता हयात शिजलेले काळे वाटाणे व् दोन ग्लास पाणी टाकून चांगली उकळी काढ़ा
  11. आता हयात खोबरे कांदा हयाचे वाटन टाकून दहा मिनिट शिजु द्या
  12. काळे वाटाणे सांबर तयार आहे . गरम गरम आंबोळी सोबत serve करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर