मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत आणि ज्वारीची भाकरी

Photo of Vangache barit ani jawari chi bhakri by Rohini Rathi at BetterButter
2581
1
0.0(0)
0

वांग्याचे भरीत आणि ज्वारीची भाकरी

Sep-16-2018
Rohini Rathi
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरीत आणि ज्वारीची भाकरी कृती बद्दल

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पाककृती

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी
  2. ज्वारीचे पीठ एक कप
  3. मीठ चवीनुसार
  4. पाणी आवश्यकतेनुसार
  5. भरीत बनवण्यासाठी
  6. वांगी 3 मोठी
  7. लसणाच्या पाकळ्या तीन ते चार
  8. तेल दोन चमचे
  9. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  10. बारीक चिरलेला कांदा एक मोठा
  11. शेंगदाणे पाव कप
  12. कांद्याची पात अर्धा कप चिरलेली
  13. लाल मिरची ची पावडर एक चमचा
  14. हळदी पावडर पाव चमचा
  15. गरम मसाला एक चमचा
  16. धने जिरे पावडर एक चमचा
  17. मीठ चवीनुसार

सूचना

  1. ज्वारीची भाकरी बनविण्यासाठी सर्वप्रथम पिठामध्ये मीठ घालून मध्यम पीठ मळून घ्यावे
  2. तवा गरम करून घ्यावा
  3. पिठाची भाकरी हाताने थापून घ्यावी
  4. गरम तव्यावर भाकरी ठेवून वरच्या बाजूने पाणी लावून घ्यावे
  5. मंद आचेवर भाकरी दोन्ही बाजुने भाजुन घ्यावे
  6. वांग्याचे भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम वांग्याला तेल चोळून घ्यावे
  7. तेल लावलेली वांगी गॅसवर ठेवून सर्व बाजूने भाजून घ्यावे
  8. नंतर वांग्याच्या वरील जळालेली कातडी अलगद काढून घ्यावी
  9. नंतर मधला पांढरा भाग एका ताटात घेऊन कुस्करून घ्यावा
  10. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी हिंग जिरे ची फोडणी घालावी
  11. लसणाची पेस्ट व बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे परतून घ्यावा
  12. तेल सुटू लागल्या नंतर त्यात कांद्याची पात लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी पावडर घालून थोडेसे पाणी घालावे
  13. कुसकरलेले वांगी त्यात घालून परतून घ्यावा
  14. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून भरीत झाकण ठेवून वाफवून घ्यावे
  15. अशाप्रकारे तयार भरीत ज्वारीच्या भाकरीबरोबर वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर