मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन बिर्याणी

Photo of Chicken Biryani by silpa jorna at BetterButter
56991
83
4.4(1)
0

चिकन बिर्याणी

Oct-11-2015
silpa jorna
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन बिर्याणी कृती बद्दल

सुवासिक तांदळाची एक भारी पाॅट डीश आणि सर्वांच्या आवडत्या चवीचा भारतीय खाद्यपदार्थ !

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • आंध्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. बासमती तांदुळ - 2 कप
  2. तुकडे केलेले चिकन - 500 ग्राम
  3. हिरव्या मिरच्या - 2
  4. चिरलेला कांदा - 1
  5. चिरलेला टोमॅटो - 1
  6. नारळाचे दूध - 1 कप
  7. वेलदोडा - 1
  8. दालचिनी - 1 पट्टीचे तुकडे
  9. लवंग - 3
  10. स्टार बडीशेप - 1
  11. कोथिंबीर - 1 जुडी
  12. गरजेनुसार मीठ
  13. मिरची पावडर - 1 टी स्पून
  14. तेल - 3 टेबल स्पून
  15. हळद पावडर - 1 टी स्पून
  16. आल्ले लसूण पेस्ट - 2 टेबल स्पून
  17. तमालपत्र - 1
  18. गरम मसाला - 1 टी स्पून

सूचना

  1. चिकन स्वच्छ धुवून घ्यावे , त्यात मीठ, मिरची पावडर, हळद पावडर मिसळून घ्यावी आणि बाजूला ठेवावे.
  2. तांदुळ धुवून 20 मिनिटांपर्यंत भिजवून ठेवावेत.
  3. प्रेशर कुकर घेऊन त्यात तेल टाकणे. तेल गरम झाल्यावर मसाले घालून परतावे. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून अर्धपारदर्शक होईपर्यंत तळावे.
  4. आता आल्ले - लसूण पेस्ट घालून तळावे.
  5. त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत तळावे . त्यात चिकन घालावे, गरम मसाला आणि थोडे पाणी ( 1/4 कप ) घालून तयार होईपर्यंत उकळू द्यावे.
  6. तांदळातील पाणी काढून टाकावे आणि ते चिकन मध्ये मिसळावे. त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि नारळाचे दूध घालावे.
  7. 2 कप तांदळासाठी 3 1/2 कप पाणी प्रमाण असले पाहिजे. प्रमाणानुसार जुळवून घ्यावे , कोथिंबीर घालावी आणि झांकण लावून 2 शिट्ट्या होऊ द्याव्यात.
  8. वाफ पूर्णपणे जिरू द्यावी आणि बाऊलभर रायत्या सोबत गरमागरम खायला द्यावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
audrey malegam
Jun-21-2020
audrey malegam   Jun-21-2020

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर