व्हेजिटेबल बिर्याणी | Vegetable Biryani Recipe in Marathi

प्रेषक Dr.Kamal Thakkar  |  17th Apr 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • व्हेजिटेबल बिर्याणी , How to make व्हेजिटेबल बिर्याणी
व्हेजिटेबल बिर्याणी by Dr.Kamal Thakkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

135

0

व्हेजिटेबल बिर्याणी recipe

व्हेजिटेबल बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable Biryani Recipe in Marathi )

 • बासमती तांदुळ - 1 कप
 • फ्रेंच बीन्स - 1/2 कप
 • गाजर - 1/2 कप
 • हिरवे मटार - 1/2 कप
 • फ्लाॅवर - 1/2 कप
 • बटाटे - 1/2 कप
 • कांदे - 6
 • दही - 1 कप
 • आले, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट - 1 टेबल स्पून
 • तेल - 2 टेबल स्पून
 • केशर - 1 चिमुट 1 टेबल स्पून दुधात भिजवलेले
 • तूप - 2 टेबल स्पून
 • जीरे - 1 टी स्पून
 • लवंगा - 5
 • दालचिनी - 1 इंच
 • वेलदोडे - 5
 • तमालपत्र - 2

व्हेजिटेबल बिर्याणी | How to make Vegetable Biryani Recipe in Marathi

 1. सर्व भाज्या मध्यम आकारात चिरून कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवाव्यात . आता त्या भाज्या अर्ध्या शिजलेल्या आहेत.
 2. आता कांदे तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
 3. केशर दुधामध्ये भिजवावे.
 4. तांदुळ अर्धा तास भिजवून ठेवावेत. पाणी उकळावे आणि मीठ घालून अर्धे शिजवावे, लगेच चाळणीने पाणी काढून टाकावे.
 5. आता प्रेशर कुकर घ्यावा . त्यामध्ये तेल टाकावे, तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, लवंग, दालचिनी, वेलदोडे, तमालपत्र टाकून परतून घ्यावे.
 6. आता आले लसूण पेस्ट घालून उग्र वास जाईपर्यंत परतावे. त्यामध्ये हळद, मिरची पावडर, जीरे, धणे पावडर, गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घालून परतावे.
 7. त्यामध्ये मीठ आणि अर्ध्या शिजलेल्या भाज्यासहित त्या ज्यात शिजवल्या त्या पाण्यासह टाकावे. व्यवस्थित मिसळून घ्यावे.
 8. आता आपण अगोदर तळून ठेवलेला थोडा कांदा त्यात घालावा.
 9. आता गॅस बंद करावा आणि दही घालून सर्व भाज्यांना मसाल्याचे आवरण तयार होईपर्यंत व्यवस्थित मिसळून घ्यावे .
 10. एका बाऊलमध्ये भाज्यांचे अर्धे मिश्रण घ्यावे .
 11. आता कुकरच्या तळाशी भाज्यांचा थर असेल, त्यावर तांदळाचा थर घालावा. थोडे तूप सगळीकडे समान पसरावे आणि थोडे केशर दूध घालावे.
 12. बाऊलमध्ये आपण काढून ठेवलेल्या भाज्या मिसळाव्यात . सगळीकडे समान पसरावे . तुम्ही काही पुदिन्याच्या पानाचा थर देखील घालू शकता.
 13. शेवटी शिल्लक राहिलेला तांदुळ सगळ्यात वरील बाजूस घालावा. या थरावर थोडे तूप आणि शिल्लक राहिलेले केशर दूध एकसमान पसरावे.
 14. थोडा तळलेला कांदा त्यावर घालावा आणि कुकरचे झाकण लावावे.
 15. आता कुकरमध्ये आपण बिर्याणी तयार केली आहे. बिर्याणी वाढण्यापूर्वी अर्धा तास अगोदर तुम्ही गॅस मध्यम आचेवर ठेवावी आणि बिर्याणी 15-20 मिनिटे शिजू द्यावी.
 16. तुमच्या जेवणाला उशीर होणार असेल, तर तुम्ही कुकर लोखंडाच्या पॅनवर ठेवू शकता, अप्रत्यक्ष उष्णता देऊन पुन्हा गरम करू शकता . तुमच्या आवडत्या रायत्यासोबत गरमागरम खायला द्यावी.

My Tip:

कुकरमध्ये शिजवल्यामुळे दम इफेक्ट मिळेल, त्यासाठी पॅन कणकेने बंद करावा लागणार नाही आणि बिर्याणी खाली लागण्याची भिती देखील राहणार नाही.

Reviews for Vegetable Biryani Recipe in Marathi (0)