बेसन लाडू | Besan Ladoo Recipe in Marathi

प्रेषक Disha Khurana  |  2nd Nov 2015  |  
4.7 from 4 reviews Rate It!
 • बेसन लाडू , How to make बेसन लाडू
बेसन लाडू by Disha Khurana
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

349

4

बेसन लाडू recipe

बेसन लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Besan Ladoo Recipe in Marathi )

 • 250 ग्रॅम हरभरा पीठ / लहान वाटाण्याचे पीठ / बेसन ( भरड पद्धतीचे )
 • 100 ग्रॅम शुद्ध तूप
 • 125-150 ग्रॅम पीठी साखर
 • 50 ग्रॅम मनुका / चिरोंजी / बदाम ( ऐच्छिक )
 • 1/2 टी स्पून वेलदोडा पावडर
 • 1.5 टेबल स्पून दूध

बेसन लाडू | How to make Besan Ladoo Recipe in Marathi

 1. बेसन आणि तूप एकजीव होईपर्यंत आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजावे , सतत हलवत रहावे.
 2. या प्रक्रियेला खूप वेळ लागतो, त्यामुळे कधी मध्यम तर कधी मंद आंच करावी, परंतु कधीही पूर्ण आंच करू नये, कारण त्यामुळे पीठ जळण्याची शक्यता जास्त असते.
 3. कायम कडेपासून पूर्ण वेळ हलवत रहाणे चालू ठेवणे.
 4. एकदा छान वास येऊ लागला , सुंदर सोनेरी रंग आला की त्यावर दूध शिंपडावे आणि पूर्णपणे एकजीव होण्यासाठी मिसळत रहावे आणि आंच लगेच बंद करावी , मिश्रण थंड होण्यासाठी एका मोठय़ा प्लेटवर ठेवावे.
 5. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात पीठी साखर, वेलदोडा पावडर टाकून एकत्र करावे.
 6. तुम्ही साखर, भाजलेले बेसन व तूप यांचे मिश्रण एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या छोट्या जारमध्ये एकावेळी थोडे थोडे मिश्रण करू शकता.
 7. एकदा मिश्रण एकजीव झाल्यावर त्यामध्ये सुकामेवा घालून त्याचे गोल गोल गोळे बनविणे .
 8. मिश्रण जर तुम्हाला जास्त मऊ वाटले तर आकार दिल्यानंतर आकार बिघडू नये म्हणून ते 20-30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवू शकता .
 9. बदाम, मनुका किंवा चिरोंजीने सजवणे आणि खायला देणे.

My Tip:

बेसन मिश्रण भाजत असताना हलवणे कधीही थांबवू नये आणि नेहमी चवीनुसार पीठी साखर घालावी.

Reviews for Besan Ladoo Recipe in Marathi (4)

Gunjan Singh8 months ago

Nice
Reply

Reetu Pooniaa year ago

Reply

Anushka Basantani2 years ago

Superb!
Reply

Mofida Begum2 years ago

Reply

Cooked it ? Share your Photo