मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा बिर्याणी

Photo of Egg Biryani by Aameena Ahmed at BetterButter
8327
190
4.5(0)
2

अंडा बिर्याणी

Nov-13-2015
Aameena Ahmed
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा बिर्याणी कृती बद्दल

तुम्ही जर शाकाहारी बिर्याणीला कंटाळला असाल तर ही रुचकर अंडा बिर्याणी करून पहावी .

रेसपी टैग

  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. अंडा मिश्रणासाठी :
  2. अंडी - 6
  3. तेल - 1/2 कप
  4. खडा गरम मसाला ( 4-6 लवंगा, 4-6 काळी मिरीचे दाणे )
  5. हिरवा वेलदोडा -2 करडे वेलदोडे, 2 दालचिनी
  6. कांदे मध्यम 2 स्लाईस केलेले
  7. टोमॅटो मध्यम 3 स्लाईस केलेले
  8. नारळाचे दूध 1/2 कप
  9. आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून
  10. हळद 1/2 टी स्पून
  11. मीठी 1 पूर्ण भरलेला टी स्पून
  12. लाल मिरची पावडर - 1 1/2 टी स्पून
  13. जीरे पावडर - 1 टी स्पून
  14. धणे पावडर - 1 टी स्पून
  15. संपूर्ण हिरव्या मिरच्या - 5
  16. हिरवी कोथिंबीर - 1 छोटी जुडी
  17. पुदिना - 10-12 पाने
  18. गरम मसाला पावडर - 1/2 टी स्पून
  19. भातासाठी :
  20. तांदुळ - किलो ( 30 मिनिटे भिजवलेला )
  21. चवीनुसार मीठ

सूचना

  1. अंडी कडक पाण्यात उकळावीत. अंडी शिजल्यानंतर कवच काढून बाजूला ठेवावे.
  2. पॅनमध्ये अर्धा कप तेल टाकावे, नंतर खडा गरम मसाला घालून स्लाईस केलेला कांदा टाकावा आणि सोनेरी तांबूस होईपर्यंत तळावे.
  3. आता आल्ले लसूण पेस्ट घालून एक मिनिटांसाठी मंद आचेवर परतावे. त्यानंतर हळद, मीठ, लाल मिरची पावडर, जीरे पावडर, धणे पावडर, थोडे पाणी घालून सर्व एकत्र पुन्हा चांगले परतावे.
  4. स्लाईस केलेले टोमॅटो घालून तेल वेगळे व्हायला सुरुवात होईपर्यंत शिजवावे. नारळाचे दूध टाकून तेल वेगळे व्हायला सुरवात होईपर्यंत पुन्हा शिजवावे. आता उकडलेली अंडी घालून काळजीपूर्वक मिसळावीत आणि संपूर्ण मिश्रण बाजूला ठेवावे.
  5. भातासाठी : चवीपुरते मीठ घालून पाणी उकळावे.
  6. बासमती तांदुळ 3/4 शिजवावा, त्यातील पाणी पूर्णपणे काढून तांदुळ बाजूला ठेवावेत.
  7. आता थर रचावेत , एक लहान ( जाड तळ असणारे गोल शिजवण्याचे भांडे ) घेऊन त्यावर 1 टी स्पून तूप पसरावे, त्यानंतर पहिला थर भाताचा घालावा, त्यावर संपूर्ण हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर, पुदिन्याची पाने, गरम मसाला पावडर टाकावी.
  8. पहिल्यांदा डीश अल्यूमीनियम फाॅइलने सील करावी, त्यावर झांकण ठेवावे आणि त्याच्यावर वजन ठेवावे . उच्च आंचेवर 5 मिनिटे आणि मंद आचेवर 10 मिनिटे शिजवावे . अंडा बिर्याणी खायला देण्यासाठी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर