मुख्यपृष्ठ / पाककृती / पोह्यांची उकड

Photo of STEAMED flattened rice by Minal Sardeshpande at BetterButter
644
6
0.0(0)
0

पोह्यांची उकड

Dec-11-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोह्यांची उकड कृती बद्दल

पारंपरिक कोकणी झटपट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पोहे 2 वाट्या
  2. ताक दोन वाट्या
  3. ओल्या मिरच्या 3
  4. तूप दोन चमचे
  5. जीरं एक चमचा
  6. आलं पेस्ट पाव चमचा
  7. लसूण दहा पाकळ्या
  8. कढिलिंबाची पाच सहा पाने
  9. मीठ
  10. हळद पाव चमचा

सूचना

  1. पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवावेत.
  2. लसूण सोलावी.
  3. मिरच्यांचे तुकडे करावे.
  4. पोहे ताक घालून मिक्सरला फिरवावे, रवाळ रहायला हवं.
  5. कढईत तूप तापत ठेवावं.
  6. तापलं की जीरं, लसूण, मिरच्या घालाव्यात.
  7. लसूण तळली की त्यात हळद कढिलिंबाची पाने घालावीत.
  8. आता त्यात फिरवलेलं मिश्रण, मीठ, आलं पेस्ट घालून ढवळावे.
  9. गॅस मंद ठेवावा.
  10. पाच मिनिटं वाफ येऊ द्यावी. घट्ट वाटली तर थोडं पाणी घालावं.
  11. गरमागरम उकड आणि त्यावर तूपाची धार!!! अहाहा!!!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर