Photo of Dhokla by Dhara Shah at BetterButter
708
5
0.0(0)
0

ढोकला

Feb-12-2018
Dhara Shah
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढोकला कृती बद्दल

ढोकला खूप सोपी, पौष्टिक पदार्थ आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप बेसन पिठ
  2. २ चमचे रवा
  3. १ कप  ताक
  4. १ चमचा लिंबाचा रस
  5. १ लहान चमचा साखर
  6. २ चमचे पाणी
  7. १ लहान चमचा हळद
  8. २ लहान चमचे इनो
  9. १ चमचा तेल
  10. २ लहान चमचे साखर
  11. १/२ चमचा मिरची पेस्ट
  12. १/२ चमचा आले पेस्ट
  13. चवीपुरते मिठ
  14. फोडणीसाठी:
  15. १ चमचा तेल
  16. १/२ चमचा मोहोरी
  17. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  18. १/२ लहान चमचा हिंग

सूचना

  1. बेसन पिठ, रवा, साखर, मिरची पेस्ट, आले पेस्ट, हळद, लिंबाचा रस, तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात १ ते सव्वा कप ताक घालावे.
  2. वरील मिश्रण तयार झाले कि मिश्रणाचे दोन वेगवेगळे भाग करावे व वेगवेगळ्या भांड्यत ठेवावे.
  3. एक मध्यम खोलीचा पसरट फ्राईंग पॅन घ्यावा. त्यात अर्ध्यापेक्षा किंचीत कमी भरेल एवढे पाणी उकळत ठेवावे. त्या पॅनमध्ये राहिल एवढ्या उंचीचे मेटलचे भांडे घ्यावे त्याला तेलाचा हात लावून घ्यावा. फ्राईंग पॅनच्या झाकणाला स्वच्छ पंचा बांधून घ्यावा म्हणजे वाफेचे पाणी ढोकळ्यात न पडता पंच्यात शोषले जाईल.
  4. एक भाग मिश्रणात १ टिस्पून इनो घालून पटापट एकाच दिशेने अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या पॅनमध्ये ठेवावे वरून पंचा लावलेले झाकण ठेवावे.
  5. मध्यम आचेवर १५ ते १८ मिनीटे वाफ काढावी. वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये. यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे. पाणी कमी पडले आणि सर्व पाणी संपले तर ढोकळा भांड्याच्या तळाला चिकटून करपू शकतो.
  6. जोवर ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करू घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
  7. १५ मिनीटांनी गॅस बंद करावा. १-२ मिनीटांनी भांडे बाहेर काढावे. ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी. ढोकळयाच्या मिश्रणाचा उरलेला भागही वरील प्रमाणेच वाफवून घ्यावा.
  8. हा ढोकळा हिरव्या तिखट चटणी बरोबर झकासच लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर