Photo of Gavthi chicken handi by Geeta Koshti at BetterButter
2061
11
0.0(1)
0

Gavthi chicken handi

Feb-21-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गावठी चिकन 500 ग्राॅम
  2. 4 मोठे कांदे
  3. 1 वाटी सुके खोबरे
  4. लसुण 1 , टोमॅटो 1
  5. आलं 2" , हळद 1/2 चमचा
  6. धणेपूड 1/2 चमचा , लाल तिखट 1 चमचा
  7. खानदेशी काळा गरम मसाला 3 चमचा
  8. कोथींबिर , तेजपान 3 , कढीपत्ता
  9. चविनुसार मीठ, तेल ,

सूचना

  1. चिकन नीट धुवुन घ्यावे
  2. मातीची हंडी त तेल गरम करत ठेवावे व त्यात ,चिमुटभर हळद घालावी त्यात धुतलेले चिकन घालावे व तेलात चांगले परतावे
  3. व त्यात चिकन पूर्णपणे बुडेल ईतके पाणि टाकुन , थोडे मिठ घालून अर्धवट झाकण ठेवुन शिजवून घ्यावे
  4. शिजल्यावर गॅस बंद करावा शिजवून पिवळे चिकन तयार होईल
  5. मसाला- कांदा उभा चिरुन घ्यावा कढई गरम करत ठेवा गरम कढईत चिरलेला कांदा व 1 चमचा तेल घालावे व कांदा गुलाबी रंगावर भाजुन घ्यावा
  6. भाजलेला कांदा मिक्सरच्या भांड्यात काढुन घ्यावा व त्याच कढईत किसलेले सुके खोबरे घालावे
  7. खरपुस भाजुन घ्यावे पण जळु देऊ नये,हे भाजलेले खोबारेही कांदा घातलेल्या मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यातच आलं , लसुण , टोमॅटो कोथींबिर हे सर्व वाटुन घ्या
  8. कढईत तेल गरम करत ठेवावे,तेल गरम झाले कि त्यात तमालपत्र वरिल वाटन घालावे व चांगले गुलाबी होईपर्य़त परतावे
  9. आता यात चिकनसाठी तयार गरम मसाला व लाल तिखट घाला.वाटन मसाला परतुन घेत असतांना नीट हलवुन घ्यावे म्हणजे मसाला खाली चिकटनार नाही
  10. मसाल्यातुन तेल सुटायला लागल्यावर ह्यात चिकनचे तुकडे घालावेत व चांगले परतुन घ्यावे
  11. चिकनचे तुकडे मसाल्यात नीट परतल्यावर हे पिवळ्या चिकन रस्स्यात टाकून एकजीव करुन घ्यावे,
  12. चांगली उकळी येऊ द्या
  13. चवीनुसार मीठ घालुन मिक्स करा उकळ्यांनंतर गॅस बंद करावा व कोथींबीर घाला गावठी चिकन हंडी तयार.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dinesh Yadav
Feb-22-2018
Dinesh Yadav   Feb-22-2018

Awesome

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर