डाळिंबी भात (कडव्या वालाची खिचडी) | Field Beans Rice Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  8th May 2018  |  
5 from 5 reviews Rate It!
 • Field Beans Rice recipe in Marathi,डाळिंबी भात (कडव्या वालाची खिचडी), Nayana Palav
डाळिंबी भात (कडव्या वालाची खिचडी)by Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

5

डाळिंबी भात (कडव्या वालाची खिचडी) recipe

डाळिंबी भात (कडव्या वालाची खिचडी) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Field Beans Rice Recipe in Marathi )

 • तांदूळ २ वाटी
 • सोललेल्या डाळिंब्या १ वाटी
 • कांदा १
 • टोमॅटो २
 • आस लसूण पेस्ट १ टेबलस्पून
 • मालवणी मसाला (लाल तिखट) १ टेबलस्पून
 • गरम मसाला १ टीस्पून
 • लसूण ५-६ पाकळया
 • हिंग १/४ टीस्पून
 • हळद १/४ टीस्पून
 • मोहरी १/४ टीस्पून
 • जिरे १/४ टीस्पून
 • कढीपत्ता ७-८ पाने
 • तेल किंवा तूप फोडणीसाठी
 • कोंथिबीर आवश्यकतेनुसार
 • मीठ आवश्यकतेनुसार
 • ओले खोबरे आवश्यकतेनुसार

डाळिंबी भात (कडव्या वालाची खिचडी) | How to make Field Beans Rice Recipe in Marathi

 1. तांदूळ धूवून घ्या.
 2. कुकर मध्ये तूप घाला.
 3. तूप गरम झाले की हिंग, हळद, मोहरी, जिर, कढीपत्ता याची फोडणी करा.
 4. आता बारीक चिरलेला कांदा घाला.
 5. कांदा गुलाबी झाला की, बारीक चिरलेला टोमॅटो घाला.
 6. नीट परता.
 7. आता आल लसूण पेस्ट परतून घ्या.
 8. आता मसाले घाला.
 9. नीट परता.
 10. आता सोललेल्या डाळिंब्या घाला.
 11. नीट परता.
 12. आता धूतलेले तांदूळ घालून परता.
 13. आता मीठ घाला.
 14. कुकर बंद करून २ शिट्टया होउ दया.
 15. तयार आहे तुमचा रूचकर डाळिंबी भात.
 16. कोंथिबीर, ओले खोबरे घालून सजवा.
 17. तळलेला पापड ताकासोबत सर्व्ह करा.

My Tip:

यात तुम्ही तुम्हाला आवडणारया भाज्या घालू शकता.

Reviews for Field Beans Rice Recipe in Marathi (5)

Mahi Mohan kori5 months ago

Chan
Reply

Dhanashri Parulekar5 months ago

My favorite
Reply

Darshana Chavan5 months ago

What u did 4/5 paklya lasun
Reply

Avinash Ashirgade5 months ago

1Number, One dish meal.
Reply

Anvita Amit5 months ago

yummy
Reply

Cooked it ? Share your Photo