मोकळं बेसन (पीठलं) | Besan Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  11th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Besan recipe in Marathi,मोकळं बेसन (पीठलं), Manasvi Pawar
मोकळं बेसन (पीठलं)by Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

मोकळं बेसन (पीठलं) recipe

मोकळं बेसन (पीठलं) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Besan Recipe in Marathi )

  • एक वाटी चणाडाळ भिजवून
  • एक चमचा जिरे
  • पाव चमचा हळद
  • दोन हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • लसूण चार-पाच पाकळ्या
  • थोडं आलं
  • एक चमचा धणे
  • मीठ चवीनुसार
  • लाल तिखट
  • १/२ वाटी तेल
  • कांदा एक चिरलेला
  • मोहरी
  • हिंग
  • कढीपत्ता

मोकळं बेसन (पीठलं) | How to make Besan Recipe in Marathi

  1. प्रथम डाळ धुऊन त्यामध्ये लसूण आलं मिरची कोथिंबीर जीरे हळद मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
  2. आता हे मिश्रण कुकरमध्ये वाफवून घ्यावे
  3. थंड झाल्यावर ते फोडावे व मोकळे करून घ्यावे
  4. आता एका कढईत तेल गरम करून यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता व कांदा परतून घ्यावा
  5. लाल तिखट घालून मोकळ केलेले बेसन घालून व्यवस्थित परतावे
  6. थोडं थोडं तेल घालून बराच वेळ परतावे
  7. आता आपलं मोकळं बेसन तयार आहे

My Tip:

या बेसनला तेल भरपूर घ्यावे. आणि आपण फक्त उकडून याच्या वड्या ही खाऊ शकतो.

Reviews for Besan Recipe in Marathi (0)