इंस्टंट केशर मावा पेढा | Instant Kesar Mawa Pedha Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Instant Kesar Mawa Pedha recipe in Marathi,इंस्टंट केशर मावा पेढा, Ajinkya Shende
इंस्टंट केशर मावा पेढाby Ajinkya Shende
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

About Instant Kesar Mawa Pedha Recipe in Marathi

इंस्टंट केशर मावा पेढा recipe

इंस्टंट केशर मावा पेढा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Kesar Mawa Pedha Recipe in Marathi )

  • २०० ग्रॅम जाडसर किसलेला खवा
  • २ चमचे साजूक तूप
  • मिल्क पावडर साधारण एक वाटी
  • पाव वाटी दूध
  • अर्धा तास गरम पाण्यात भिजवलेल्या १२-१५ केशराच्या काड्या
  • पाव चमचा वेलची पावडर
  • अर्धी वाटी साखर
  • खाण्याचा पिवळा रंग(आवश्यक असल्यास)
  • सजावटीसाठी बादामाचे काप

इंस्टंट केशर मावा पेढा | How to make Instant Kesar Mawa Pedha Recipe in Marathi

  1. प्रथम एका पॅन मध्ये २ चमचे साजूक तूप टाकून तूप व्यवस्थित तापल्यावर त्यात किसलेला खवा टाकून खवा मध्यम आचेवर साधारण ४-५ मिनिट भाजून घ्यावा.
  2. नंतर त्यात मिल्क पावडर टाकून खवा पुन्हा २ मिनिट भाजून घ्या व भाजलेला खवा एका बाऊल मध्ये काढून ठेवा.
  3. नंतर एका पॅन मध्ये साखर,साखरेएवढचं पाणी व वेलची पावडर टाकून एकतारी पाकापेक्षा थोडा कमी घट्ट पाक तयार करून घ्यावा.
  4. पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेला खवा,पाण्यात भिजवलेली केशर व थोडा खाण्याचा पिवळा रंग टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व थंड झाल्यावर साधारण १० मिनिट फ्रिज मध्ये ठेवावे.
  5. नंतर खव्याच्या मिश्रणाचे हव्या त्या आकारात पेढे तयार करून घ्यावेत.
  6. तयार पेढे एका प्लेट मध्ये रचून वरून बादामाचे काप व केशराच्या काड्या ठेवून गार्निश करून घ्यावे.

My Tip:

आवडत असल्यास तुम्ही ह्या पेढ्यात ड्राय फ्रुट पावडर सुद्धा टाकू शकता..

Reviews for Instant Kesar Mawa Pedha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती