मँगो पास्ता | Mango Pasta Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango Pasta recipe in Marathi,मँगो पास्ता, Aarti Nijapkar
मँगो पास्ताby Aarti Nijapkar
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मँगो पास्ता recipe

मँगो पास्ता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Pasta Recipe in Marathi )

  • उकडलेले पास्ता १ वाटी
  • आंबा पेस्ट
  • लसूण पाकळ्या २
  • पांढरा कांदा चिरलेला १ लहान
  • लाल जाडी मिरची चिरलेली १
  • आंब्याचे तुकडे १ वाटी
  • काळीमिरी १/२ लहान चमचा
  • आंबा पास्ता
  • आंबा पेस्ट
  • फ्रेश क्रीम १/४ वाटी
  • किसलेले चीझ १/४ वाटी
  • लिंबाचा रस २ ते ३ थेंब
  • काळीमिरी कुटलेली १/२ लहान चमचा
  • आंबा कापलेले तुकडे १ वाटी
  • तेल १ लहान चमचा
  • मीठ चवीनुसार

मँगो पास्ता | How to make Mango Pasta Recipe in Marathi

  1. प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला बारीक कांदा आणि कसून पाकळ्या थोडं लालसर होईपर्यंत परतवून घ्या
  2. मग लाल जाडी मिरची व कुटलेली काळीमिरी घालून व्यवस्थित परतवून घ्या नंतर त्यात आंब्याचे तुकडे घालून ते नरमसर होईपर्यंत परतवून घ्या व गॅस बंद करा आणि मिश्रण गार करून घ्या
  3. गार मिश्रण मिक्सर च्या भांड्यात घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या (गरजेनुसार पाणी घालावे)
  4. कढईमध्ये तेल गरम करून त्यात पेस्ट घालून परतवून घ्या (फार वेळ नाही) थोडे पाणी घाला
  5. आता चवीनुसार मीठ , फ्रेश क्रीम घालुन मिश्रम एकत्र करून घ्या
  6. आता त्यात चिरलेली लाल जाडी मिरची व काळीमिरी घालून त्यात पास्ता घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या
  7. आता वरून किसलेले चीझ व लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्या शेवटी आंब्याचे तुकडे घालून एकत्र करून गॅस बंद करा
  8. गरमागरम आंबा पास्ता तयार आहे आवडीनुसार सजावट करून सर्व्ह करा

My Tip:

शेवटी घातलेले आंब्याचे तुकडे शिजवू नयेत

Reviews for Mango Pasta Recipe in Marathi (0)