Home / Recipes / Palak paneer

Photo of Palak paneer by Ajinkya Shende at BetterButter
544
4
0.0(0)
0

Palak paneer

Feb-11-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Punjabi
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. २ जुडया पालकाची पानं
  2. २ मध्यम आकाराचे बारीक कापलेले कांदे
  3. १ मध्यम आकारचा बारीक चिरलेला टोमॅटो
  4. खडा मसाला(२ लवंग,२ हिरव्या वेलची,छोटा दालचीनी तुकडा,जीरं,तेजपत्ता)
  5. ३-४ हिरव्या मिरची
  6. अर्धा चमचा आलं पेस्ट,अर्धा चमचा लसुण पेस्ट
  7. बिजवलेले काजू ५-६
  8. तेल
  9. बटर
  10. अर्धा चमचा लाल मिर्ची पावडर
  11. गरम मसाला अर्धा चमचा
  12. अर्धा चमचा किचन किंग मसाला
  13. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  14. कसुरी मेथी
  15. कोथिम्बीर
  16. पनीर १५० ग्रॅम

Instructions

  1. प्रथम पालकाची पानं ३-४ मिनिट गरम पाण्यात मीठ टाकून ब्लांच करुन(शिजवुन) घ्यावी व चाळणीने गाळून थंड पाण्यात ठेवावी.
  2. नंतर पॅन मधे २-३ चमचे तेल घेवून तेल गरम झाल्यावर त्यात खडा मसाला टाकून अर्धा मिनिट खडा मसाला परतवुन घ्यावा.
  3. नंतर त्यात बारीक चिरलेले कांदे टाकून कांदे लालसर होईपर्यंत परतवुन घ्यावे.
  4. नंतर त्यात हिरव्या मिरच्या,आलं लसुण पेस्ट टाकून थोडं परतवुन त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो शिजेपर्यंत व्यवस्थित परतवुन घ्यावे.
  5. नंतर हा कांदा टोमॅटो मसाला थंड झाल्यावर तेजपत्ता काढून पालकाची पानं,भीजवलेले काजू व कांदा टोमॅटो मसाल्याची मिक्सर मधे स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
  6. नंतर पॅन मधे २ चमचे बटर टाकून पालकाची पेस्ट व कांदा टोमॅटो मसाल्यामधुन बाजुला काढून ठेवलेला तेजपत्ता टाकून ३-४ मिनट मध्यम आचेवर परतवुन घ्यावी.
  7. नंतर हयात लाल मिर्ची पावडर,किचन किंग मसाला व धणा जीरा पावडर टाकून पुन्हा ३-४ मनिट परतवुन घ्यावे.
  8. नंतर हयात आवश्यकतेनुसार पाणी व चवीनुसार मीठ टाकून ग्रेवी व्यवस्थित एकजिव होईपर्यंत शिजू द्यावी.
  9. नंतर हयात १५० ग्रॅम पनीर,अर्धा चमचा गरम मसाला,१ चमचा बटर,थोडी बारीक चिरलेली कोथिम्बीर व थोडी कसूरी मेथी टाकून भाजी २ मिनिट शिजू द्यावी.
  10. तयार भाजी सर्विंग बाऊल मधे काढून गार्निश करुन serv करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE