Home / Recipes / Masala bhedi

Photo of Masala bhedi by Ajinkya Shende at BetterButter
835
5
0.0(0)
0

Masala bhedi

Feb-23-2018
Ajinkya Shende
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Masala bhedi RECIPE

सुप्रसिद्ध आणि अतिशय चविष्ट पदार्थ

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. पाव किलो भेंडी
  2. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कुट
  3. पाव वाटी सुकं खोबरं
  4. लसुण पाकळ्या ७-८
  5. कोथिम्बीर
  6. लाल मिर्ची पावडर साधारण पाऊण चमचा
  7. कांदा लसुण मसाला पाऊण चमचा
  8. गरम मसाला अर्धा चमचा
  9. धणा जीरा पावडर अर्धा चमचा
  10. हळद पाव चमचा
  11. आमचुर पावडर पाव चमचा किंवा १ चमचा लिम्बाचा रस
  12. मीठ चवीनुसार
  13. थोडी साखर
  14. फोडणीसाठी तेल,जीरं,हींग
  15. तेल भेंडी तळण्यासाठी
  16. कोथिम्बीर

Instructions

  1. प्रथम भेंडी स्वच्छ धुवून भेंडी हवी त्या आकारात कापून घ्यावी किंवा अख्खी असली तरी चालेल.
  2. नंतर त्याला उभ्या चिरा देवुन चार भाग करुन घ्यावे व भेंडी डीप फ्राय करुन घ्यावी.
  3. नंतर भाजलेले शेंगदाणे,सुकं खोबरं,लसुण,कोथिम्बीर,चवीनुसार मीठ टाकून मिक्सर मधे मसाला व्यवस्थित वाटून घ्यावा.
  4. नंतर हया मसाल्यात अर्धा चमचा लाल मिर्ची पावडर,अर्धा चमचा गरम मसाला,कांदा लसुण मसाला,धणा जीरा पावडर,हळद,साखर व लिम्बु किंवा आमचूर पावडर टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करुन घ्यावा.
  5. नंतर हा मसाला भेंडी मधे स्टफ करुन घ्यावा.
  6. नंतर एका पॅन मधे २-३ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जीरं व चिमुठभर हींग टाकून त्यात मसाला स्टफ केलेल्या भेंडी टाकून थोडं परतवुन झाकण ठेवून ५-७ मिनिट शिजवुन घ्यावे.
  7. नंतर वरून थोडा गरम मसाला,लाल मिर्ची पावडर,चवीनुसार मीठ( मसाल्यामधे मीठ असल्यामुळे भेंडी पुरतेचं मीठ टाकावे) व बारीक कापलेली कोथिम्बीर टाकून एखाद मिनिट भाजी थोडी परतवुन घ्यावी व गॅस बंद करावा.
  8. तयार भाजी सर्विंग प्लेट मधे काढून वरून थोडी कोथिम्बीर व किसलेलं खोबरं टाकून गार्निश करुन घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE