Home / Recipes / Baat dhokla

Photo of Baat dhokla by Swati Kolhe at BetterButter
658
9
0.0(0)
0

Baat dhokla

Mar-09-2018
Swati Kolhe
190 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Baat dhokla RECIPE

बाट म्हणजेच गव्हाचा जाड रवा किंवा दलिया. दलिया खिचडी, उपमा, शिरा या नेहमीच्या रेसिपी आपल्याला माहीत आहे. याच बाटपासून नविन रेसिपी बनवून पहिली, आणि अप्रतिम झाली ती. प्रमाण बरोबर घेतले तर रेसिपी फसणार नाही. माझी २ वेळा फसल्यावर तिसऱ्या वेळी बनली आहे. दलिया बद्दल जाणून घेऊयात. दलिया खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. हृदय व्यवस्थित कार्य करते. मेटाबॉलीझम वाढवते. तसेच वजन कमी करून फिट राहण्यात मदत करते.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Gujarat
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. बाट/दलिया ३/४ कप
  2. दही १/२कप+२tbsp
  3. मिरचीचा ठेचा २ tsp
  4. अद्रक पेस्ट १/२ tsp
  5. साखर १ tbsp
  6. लिंबाचा रस /२ tbsp
  7. फ्रुट सॉल्ट/इनो १ tsp
  8. तेल १ tsp
  9. मीठ १ tsp/चवीनुसार
  10. फोडणीसाठी:
  11. तेल १ tbsp
  12. हिंग १/८ tsp
  13. मोहरी १ tsp
  14. कडीपत्ता ५-६
  15. हिरवी मिरची १
  16. साखर १ tsp
  17. लिंबाचा रस २ tsp
  18. कोथिंबीर

Instructions

  1. प्रथम पॅनमध्ये बाट घेऊन ५-१० मिनिट मंद आचेवर भाजून घ्या.
  2. बाट थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून घ्या, बाट साधारण पीठ+रवाळ असे झाले पाहिजे.
  3. मोठ्या खोल भांड्यात दलिया घेऊन त्यात दही, अद्रक,मिरची पेस्ट, साखर, मीठ घालून मिक्स करावे.
  4. वरील मिश्रणात गरम पाणी घालून मिश्रण इडलीच्या बॅटर सारखे पातळ करून घ्यावे आणि २ १/२-३ तास मुरण्यासाठी ठेऊन द्यावे.
  5. ३ तासानंतर सर्वात आधी कुकर मध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी ठेऊन गरम करायला ठेवायचे तसेच ढोकळा डब्याला तेल लावून घ्यावे.
  6. आता ढोकळाचे बॅटर घट्ट वाटल्यास त्यात थोडे पाणी घालून एकसारखे करून घ्यावे.
  7. बॅटर मध्ये लिंबाचा रस, इनो व तेल घालून जोरात बॅटर फेसावे.
  8. बॅटर फेसल्यावर लागलीच ढोकळाच्या डब्ब्यात घालून १५-२० मिनिट वाफवून घ्यावे.
  9. २०मिनिटानंतर सूरी घालून तपासाव, स्वछ निघाल्यास झाला आहे आणि स्वछ नाही निघाल्यास आणखी ५ मिनिट वाफवावे.
  10. फोडणीसाठी फोडणीच्या कढई मध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, कडीपत्ता व मिरची घालून तडतडू द्यावे.
  11. नंतर त्यात साखर, मीठ व लिंबाचा रस घालून साखर विरघळून घ्यावी.
  12. ढोकळा थंड झाल्यावर त्याचे काप करून वरून फोडणी आणि कोथिंबीर ने सजवून सर्व्ह करावे.
  13. टीप: बाट/दलिया फक्त गव्हाचाच असतो किंवा हवा असे नाही कोणत्याही ग्रेन चा बाट बनवून तो वापरू शकता.
  14. माझ्या गुजराती मैत्रिणीच्या आईने शिकवलेली रेसिपी आहे ही.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE