Home / Recipes / Shevache ladoo

Photo of Shevache ladoo by Ajinkya Shende at BetterButter
879
7
0.0(0)
0

Shevache ladoo

Mar-09-2018
Ajinkya Shende
20 minutes
Prep Time
75 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Shevache ladoo RECIPE

हया लाडूंना शेवचे लाडू का म्हणतात हयाचं नेमकं कारण काय आहे ते माहित नाही,परंतु चवीला अतिशय मस्त व पौष्टिक असे हे लाडू...

Recipe Tags

  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अर्धा किलो जाड गव्हाचं पीठ किंवा पाव किलो बारीक रवा व पाव किलो नेहमीचं गव्हाचं पीठ
  2. १ वाटी साजुक तुप मोहनासाठी
  3. अर्धी वाटी तुप पाकासाठी
  4. गूळ पाव किलो
  5. तळण्यासाठी तेल

Instructions

  1. प्रथम जाड गव्हाचं पीठ किंवा अर्ध-अर्ध रवा आणि साधं गव्हाचं पीठ घेवुन त्यात १ वाटी गरम केलेल्या साजुक तुपाचं मोहन टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावं.
  2. नंतर हयात आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यावं व १५ मिनिट झाकुन ठेवावं.
  3. नंतर ह्याचे फोटोत दाखवल्याप्रमाणे गोळे करुन घ्यावे व मंद आचेवर तेलात तळून घ्यावे.
  4. थंड झाल्यावर हाताने थोडं मोडून मिक्सर मधे बारीक भरड तयार करुन घ्यावी.
  5. नंतर एका कढई मधे गूळ व अर्धी वाटी पाणी टाकून एकतारी पाक तयार करुन घ्यावा व पाक तयार झाल्यावर त्यात अर्धी वाटी तुप टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
  6. नंतर त्यात तयार भरड टाकून व्यवस्थित मिक्स करुन मध्यम आचेवर २ मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी.
  7. नंतर हे मिश्रण व्यवस्थित चाळवुन पुन्हा एकदा २ मिनिट झाकण ठेवून मध्यम आचेवर एक वाफ काढून घ्यावी.
  8. नंतर हे मिश्रण एका परातीत काढून व्यवस्थित रगडून(knead) त्याचे हव्या त्या आकारात लाडू बनवून घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE