Home / Recipes / Puri bhaji

Photo of Puri bhaji by Ajinkya Shende at BetterButter
2168
4
0.0(0)
0

Puri bhaji

Mar-18-2018
Ajinkya Shende
30 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Main Dish

Ingredients Serving: 3

  1. *भाजीसाठी-
  2. ५ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  3. ३ मध्यम आकाराचे उभे लांब कापलेले कांदे
  4. १ छोट्या टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी
  5. १ चमचा चण्याची डाळ(अर्धा तास गरम पाण्यात भीजवलेली)
  6. तेल
  7. २ हिरव्या मिरच्या
  8. अर्धा चमचा बारीक कापलेलं किंवा किसलेलं आलं
  9. ७-८ कढीत्त्याची पानं
  10. जीरं,मोहोरी,हींग
  11. हळद अर्धा चमचा
  12. धणा जीरा पावडर
  13. मीठ चवीनुसार
  14. अर्धा चमचा साखर
  15. कोथिम्बीर
  16. *पुरीसाठी-
  17. २ वाटी मैदा
  18. १ वाटी कणिक
  19. मीठ
  20. २ चमचे तेल
  21. तळण्यासाठी तेल

Instructions

  1. प्रथम मैदा,कणिक,२ चमचे तेल व मीठ हे सर्व एकत्र करून घट्टसर भीजवुन २० मिनिट व्यवस्थित मुरण्यासाठी झाकुन ठेवावे.
  2. नंतर एका पॅन मधे २-३ चमचे तेल टाकून तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात हींग,जीरं,मोहोरी,कढीपत्ता,मिर्ची व चणा डाळ टाकून व्यवस्थित परतवुन घ्यावे.
  3. नंतर त्यात कांदा टाकून कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतवुन घ्यावा.
  4. नंतर त्यात टोमॅटो,हळद,धणा जीरा पावडर टाकून टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत परतवुन घ्यावा.
  5. नंतर त्यात उकडलेल्या बाटाट्याच्या फोडी टाकून २ मिनिट परतवुन घ्यावे.
  6. नंतर अर्धा ते पाऊण वाटी पाणी,मीठ,साखर व कोथिम्बीर टाकून २-३ मिनिट झाकण ठेवून १ वाफ काढून घ्यावी.
  7. तयार भाजी सर्विंग बाऊल मधे काढून वरून थोडी बारीक कापलेली कोथिम्बीर टाकावी.
  8. नंतर एका कढईत पुऱ्या तळण्यासाठी तेल तापत ठेवावे.
  9. तेल तापेपर्यंत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या पुऱ्या लाटुन घ्याव्या.
  10. तेल तापल्यावर पुऱ्या तळुन घ्याव्या.
  11. गरम गरम पूरी व भाजी कच्च्या कांद्यासोबत सर्व करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE