Home / Recipes / White Pasta Soup

Photo of White Pasta Soup by Aarti Nijapkar at BetterButter
670
3
0.0(0)
0

White Pasta Soup

May-06-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
1 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT White Pasta Soup RECIPE

व्हाईट पास्ता सूप आज आपण बघणार आहोत

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Fusion
  • Boiling
  • Sauteeing
  • Soups
  • Healthy

Ingredients Serving: 1

  1. व्हाईट सॉस
  2. दूध १ वाटी
  3. फ्रेश क्रीम १/४ वाटी
  4. बटर १ लहान चमचा
  5. मैदा १ चमचा
  6. काळीमिरी १/२ लहान चमचा
  7. सूप साठी
  8. बटर किंवा तेल १ लहान चमचा
  9. हिरवे वाटाणे १० ते १२
  10. पांढरा कांदा १ लहान
  11. लाल मिरची १ लहान
  12. भाज्यांचा स्टॉक १/२ वाटी
  13. काळीमिरी १ लहान चमचा
  14. उकळवून घेतलेले पास्ता १/४ कप
  15. मीठ चवीनुसार

Instructions

  1. पास्ता साठी पाण्यात थोडं तेल व मीठ घालून अर्धे कच्चे उकळून घ्या मग थंड पाण्याखाली धरून जाळीत काढा म्हणजे पाणी निघून जाईल आणि पास्ता चिकट होणार नाही
  2. एक पॅन मध्ये बटर घाला आणि मैदा घालून मंद आचेवर परतवून घ्या रंग बदलू नये ह्याची काळजी घ्या
  3. आता आच मंद ठेवूनच हळू हळू दूध घाला व सतत ढवळत राहा म्हणजे गोळा होणार नाही छानसं पातळ क्रीम तयार होईल मग फ्रेश क्रीम घाला व एक उकळी येऊ द्या सतत ढवळत राहा
  4. आता मीठ व काळीमिरी पावडर घाला व एकजीव करून घ्या आणि गॅस बंद करा
  5. आता एका पॅन मध्ये बटर घाला त्यात लाल मिरची , पांढरा कांदा व हिरवे वाटाणे थोडे परतवून घ्या मग त्यात काळीमिरी पावडर घाला परतवून घ्या
  6. आता पास्ता घालून परतवून घ्या मग पांढरा सॉस घाला न एकत्र करून घ्या त्यात भाज्यांचा स्टॉक घाला चवीनुसार मीठ घालून उकळी काढा
  7. गरमागरम पांढरा पास्ता सूप तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE