Home / Recipes / Paneer Tikka Masala

Photo of Paneer Tikka Masala by Ajinkya Shende at BetterButter
1045
9
0.0(0)
0

Paneer Tikka Masala

May-17-2018
Ajinkya Shende
30 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Paneer Tikka Masala RECIPE

पनीर टिक्का मसाला ही डीश रेस्टॉरंट मेनुमधील बहुतेक सर्वांची आवडती डीश,पनीर,कांदा,टोमॅटो आणि सिमला मिरची दह्यात मॅरीनेट करून ग्रील केल्यामुळे ह्या डीश ला एक लाजवाब स्वाद येतो आणि हिचं ह्या डीश ची खासियत..

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • North Indian
  • Main Dish

Ingredients Serving: 3

  1. टिक्का साठी-
  2. २०० ग्रॅम पनीर चे मोठे चौकोनी तुकडे
  3. एका लहान कांद्याचे मोठे तुकडे
  4. एका लहान टोमॅटोचे मोठे तुकडे
  5. एका लहान सिमला मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे
  6. पाणी निथरवून घेतलेलं घट्ट दही
  7. १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
  8. अर्धा चमचा धणा-जीरा पावडर
  9. अर्धा चमचा गरम मसाला
  10. अर्धा ते पाऊण चमचा आलं लसूण पेस्ट
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. तेल २ चमचे
  13. मेल्टेड बटर
  14. ग्रेवी साठी-
  15. ३ मोठ्या आकाराचे मोठ्या आकारात कापलेले कांदे
  16. २ मोठ्या टोमॅटोचे मोठ्या आकारात कापलेले तुकडे
  17. ७-८ काजू
  18. ५-७ लसूण पाकळ्या
  19. छोटा तुकडा आलं
  20. तेल
  21. बटर
  22. २ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
  23. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  24. पाव चमचा हळद
  25. अर्धा चमचा किचन किंग मसाला
  26. पाऊण चमचा गरम मसाला
  27. थोडी कसुरी मेथी
  28. चवीप्रमाणे मीठ
  29. कोथिंबीर

Instructions

  1. प्रथम एका बाऊल मध्ये घट्ट दही घेऊन त्यात लाल मिरची पावडर,धणा जीरा पावडर,गरम मसाला,मीठ,आलं-लसूण पेस्ट व तेल टाकून दही व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
  2. नंतर त्यात पनीर व भाज्यांचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व झाकून फ्रिज मध्ये १५-२० मिनिट मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.
  3. तोपर्यंत एका पॅन मध्ये ४-५ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यावा.
  4. नंतर त्यात टोमॅटो टाकून टोमॅटो व्यवस्थित नरम शिजेपर्यंत परतवून घ्यावे व थंड झाल्यावर भिजवलेले काजू,आलं व लसूण टाकून ह्याची मिक्सर मध्ये स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
  5. नंतर पॅन मध्ये २ चमचे तेल आणि २ चमचे बटर टाकून तेल व बटर व्यवस्थित तापल्यावर त्यात तयार मसाला पेस्ट टाकून ३-४ मिनिट परतवून घ्यावी.
  6. नंतर त्यात लाल मिरची पावडर,हळद,धणा जीरा पावडर व किचन किंग मसाला टाकून ग्रेवी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावी व आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून ग्रेवी मध्यम आचेवर शिजू द्यावी.
  7. तोपर्यंत दह्यात मॅरीनेट केलेलं पनीर व भाज्या ग्रिल पॅन वर मेल्टेड बटर लावून व्यवस्थित ग्रिल करून घ्यावे(ग्रील पॅन नसल्यास फ्राय पॅन मध्ये पनीर व भाज्या टॉस करून घेऊ शकता).
  8. ग्रेवी मध्ये ग्रील केलेलं पनीर,भाज्या,गरम मसाला,कसुरी मेथी,थोडी कोथिंबीर व मॅरीनेशन करून उरलेलं दही टाकून भाजी २-३ मिनिट शिजवून घ्यावी.
  9. तयार भाजी सर्विंग प्लेट मध्ये काढून वरून कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यावी व बटर पराठ्यासोबत सर्व करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE