पालकवडी (स्टफ बटाटा) | Palak vadi (stuff batata) Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak vadi (stuff batata) recipe in Marathi,पालकवडी (स्टफ बटाटा), Maya Ghuse
पालकवडी (स्टफ बटाटा)by Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

पालकवडी (स्टफ बटाटा) recipe

पालकवडी (स्टफ बटाटा) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak vadi (stuff batata) Recipe in Marathi )

  • पालक पाने 15-20
  • बटाटे 2
  • बेसन दिड वाटी
  • तांदळाचे पीठ 4 चमचे
  • दही 4 चमचे
  • तिखट 2 चमचे
  • हळदं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • ओवा पाव चमचा
  • तेल 2वाट्या तळणासाठी

पालकवडी (स्टफ बटाटा) | How to make Palak vadi (stuff batata) Recipe in Marathi

  1. बटाटा साल काढून पातळ चिरून घेतला,त्यात दही, तिखट, मीठ टाकून मिसळून ठेवले
  2. बेसन घेऊन त्यात तांदळाचे पीठ तिखट ,हळदं ओवा, ,मीठ टाकून भिजवून ठेवले
  3. पालकाचे पानं धूवून पूसून घेतली
  4. पालकाचे पानं बेसनात बूडवून त्यावर बटाट्याचे काप ठेवून पानाची घडी करून वडीचा आकार दिला
  5. सर्व वड्या बेसनात बूडवून घेतल्या
  6. गरम तेलात मध्यम आचेवर तळल्या
  7. हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह केल्या

My Tip:

बटाटे दह्यात मैरीनेट केल्यामुळे थोडी आंबूस चव येते त्यामुळे पालकाची उग्र चव येत नाही,हिरव्या चटणी बरोबर लज्जत वाढते.

Reviews for Palak vadi (stuff batata) Recipe in Marathi (0)