बैंगन कबाब | Bengan Kabab Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bengan Kabab recipe in Marathi,बैंगन कबाब, priya Asawa
बैंगन कबाबby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

4

0

बैंगन कबाब recipe

बैंगन कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bengan Kabab Recipe in Marathi )

  • भरीत चे वांगी ला तेल लावून गॅसवर भाजुन साल काढून मॅश केलेले गर 1 वाटी
  • 3 मोठे चमचे ज्वारी चे पीठ
  • 2 मोठे चमचे तांदळाचे पिठ
  • 2 मोठे चमचे गव्हाचे पीठ
  • लसुण बारीक चिरलेला 2 चमचे
  • हिरवी मिरची व कोथिंबीर ची पेस्ट मोठे 2 चमचे
  • धने पावडर 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी व फोडणी साठी
  • तीळ 2 चमचे

बैंगन कबाब | How to make Bengan Kabab Recipe in Marathi

  1. एका कडाईत तेल गरम करायला गॅसवर ठेवा
  2. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून थोडा भाजावे मिरची व कोथिंबीर ची पेस्ट अजून थोडा भाजावे
  3. आता त्यात मॅश केलेले वांगी, धने पावडर व चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे
  4. अशा प्रकारे परतुन घ्यावे व थंड करायला ठेवावे
  5. तिन्ही पिठ मिक्स करून घ्या
  6. बनवलेले सारण व पिठ व्यवस्थित मिक्स करून मळून घ्या
  7. अश्या प्रकारे
  8. कबाब बनवण्यासाठी हाताला तेल लावा व स्टिल ची रवि असते त्याचा मागच्या बाजूला तेल लावा
  9. अशा प्रकारे पिठ लावुन व हळूहळू सरकवून कबाब काढून घ्या अशे सगळे कबाब तयार करा
  10. एका प्लेट मध्ये तीळ पसरुन त्याच्यावर हळुच कबाब फिरवून कबाबला तीळ लावुन घ्या
  11. तळ्यान्यासाठी एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  12. तेल गरम झाल्यावर एकेक कबाब हळुच तेल मध्ये सोडून चांगले खरपूस तळून घ्या
  13. आपले गरमागरम कबाब तयार

My Tip:

कबाब तळताना हळूच कडाईत सोडावे

Reviews for Bengan Kabab Recipe in Marathi (0)