उपवासाचे मेदु वडे | Upvaas Medu Vade Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  7th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Upvaas Medu Vade recipe in Marathi,उपवासाचे मेदु वडे, samina shaikh
उपवासाचे मेदु वडेby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

0

1

उपवासाचे मेदु वडे recipe

उपवासाचे मेदु वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvaas Medu Vade Recipe in Marathi )

  • 1 वाटी वरी तांदळाचे पीठ
  • 2 उकड्लेले बटाटे किसून
  • अर्धा चमचा जिरे पुड
  • 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  • मीठ (चवी पुरते)
  • अर्धा चमचा तूप
  • पाव चमचा साखर
  • 2चमचे शेंगदाना कूट
  • 2 चमचे साबूदाणा पीठ
  • तेल(तळण्यासाठी)

उपवासाचे मेदु वडे | How to make Upvaas Medu Vade Recipe in Marathi

  1. एका पातेल्यात वरीच्या तांदळाच्या पीठा पेक्षा 2चमचे जास्त पाणी उकळत ठेवा
  2. त्यात मीठ व तूप घालून उकळी येऊ द्या
  3. आता गँस बंद करुन वरीचे पीठ पाण्यात घालून छान मीक्स करुन घ्या व झाकून ठेवा
  4. आता तेलाचा हात लावून पीठ छान मळून घ्या
  5. या पिठात उकडलेला बटाटा जिरे पुड हिरवी मिरची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करा
  6. हे गोळे साबूदाणा पिठात घोळवुन मेदू वड्याचा आकार द्या
  7. आता चाळणी ला तेल लावून वडे त्यात ठेवून वाफेवर शिजवा
  8. वडे थंड झाले कि तेलात मंद गँस वर तळून घ्या
  9. हिरवी मिरची साखर शेंगदाणे मीठ घालून चटनी तयार करा
  10. आता गरमा गरम वडे चटनी सोबत सर्व करा

My Tip:

पिठात पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.

Reviews for Upvaas Medu Vade Recipe in Marathi (1)

Nayana Palava month ago

Wow
Reply