मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबाडीची भाकरी आणि ठेचा

Photo of Aambadichi bhakaari aani thecha by Pranali Deshmukh at BetterButter
504
1
0.0(0)
0

आंबाडीची भाकरी आणि ठेचा

Sep-16-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबाडीची भाकरी आणि ठेचा कृती बद्दल

इतिहास साक्षी आहे भाकरीचा मोह कोणालाच टाळता येत नाही ....समोर पंच पक्वानांचं ताट जरी असलं तरी मन भाकरीतच गुंतत ..... निदान आता खाता नाही आली तर रात्रीला खाईल शिळी पण जास्त रुचकर लागते ,असं मनाला आपण समजावून सांगतो ....तिच्या सोबतीला ठेचा असेल तर ....! दुधात साखरच .मग आणखी काय पाहिजे .... ती दिसायला सर्वसाधारण असली तरी आकर्षक आहे ....एकदा पाहून मन भरत नाही .....आणि कधीच बोर होत नाही .ती रसनेला आवडतेच पण त्याहीपेक्षा मनालाही तृप्त करते . भाजीवाल्याकडे रोजच अंबाडीच्या भाजीवर नजर जाते आज नको उदयाला घेऊ असं करत आज घेऊनच टाकली .आपलं बायकांचं असं असतं ....सेलमध्ये आवडलेली साडी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत रोज ती कशी छान आणि डिस्काउंट मुळे कमी रेटची आहे हे आपण स्वतःलाच पटवून देत असतो , आणि नवीन बघितलेली रेसिपी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काही चैन पडत नाही .तसच काहीसं अंबाडीच्या बाबतीत झालं ....आज उद्या करता करता घेतली एकदाची ....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. आंबाडीची भाजी 1/2 कि
  2. ज्वारीचे पीठ 2 कप
  3. मीठ
  4. थेंबासाठी साहित्य
  5. हिरव्या मिरच्या 1/2 पाव
  6. लसूण पाकळ्या 4
  7. जिरे 1 tbs
  8. मीठ
  9. तेल 2 tbs

सूचना

  1. अंबाडीचे पान तोडून स्वछ धुऊन घ्या .
  2. कूकरमधे हि पण पुरेसा पाणी घालून शिजवून घ्या .
  3. शिजल्यावर पाणी काढून घ्या
  4. थंड झाल्यावर रवीने आहटुन त्यामध्ये पचेल इतके पीठ घाला ,
  5. चवीसाठी मीठ ,आणि छान मिक्स करून गोळा बनवा .
  6. गोळा थोडं घोळणं घेऊन लाटून तव्यावर नेहमीच्या भाकरीसारखे एका बाजूला पाण्याचा हात लावून भाजून घ्या .
  7. ठेचा
  8. हिरवी मिरची थोडं तेल टाकून भाजून घेऊन त्यामध्ये मीठ +जिरं +लसूण पाकळ्या +कोथिंबीर +थोडं लिंबाचा रस एकत्र करून वाटून घ्या .जरा
  9. जाडसर ठेवा .आणि वरून तेलाची धार टाकून ....जीवनाचा आनंद घ्या ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर