मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो सूप

Photo of Tomato soup by BetterButter Editorial at BetterButter
6529
166
5.0(0)
1

टोमॅटो सूप

Aug-31-2015
BetterButter Editorial
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो सूप कृती बद्दल

बाऊलभर टोमॅटो सूपसारखी चविष्ट आणि पोट भरणारी दुसरी डिश नाही.

रेसपी टैग

  • बॅचरल्स
  • युरोपिअन
  • सिमरिंग
  • सूप

साहित्य सर्विंग: 6

  1. 750 ग्रॅम्स बारीक किसलेले / प्युरी केलेले टोमॅटो
  2. 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
  3. 1/3 कप जाड साय
  4. 2 लसणाच्या पाकळ्या किसलेल्या
  5. 1 मोठा चमचा मीठरहित बटर (लोणी)
  6. 1 मोठा चमचा ऑलिव्ह तेल/बटर
  7. 1+1/2 कप चिकन/भाजीचा रस किंवा त्यांना उकळविलेले पाणी
  8. चवीसाठी ताजी दळलेली काळी मिरी
  9. चवीनुसार मीठ
  10. सजविण्यासाठी तुळशीची 4 ताजी पाने

सूचना

  1. पॅन किंवा कुकिंग बाऊल घ्यावे , तेल व बटर एकत्र गरम करावे.
  2. चिमूटभर मीठासहित कांदा घालावा. कांदा पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवावे, यासाठी सुमारे 10-15 मिनिटे लागतील.
  3. आता किसलेली लसूण घालावी आणि 5 मिनिटे ती शिजू द्यावी. चांगले हलवत रहावे .
  4. किसलेले टोमॅटो घालावेत आणि त्यांचे रस पॅनमध्ये घालावेत . मध्यम आचेवर शिजवावे . टोमॅटो मिसळताना डाव किंवा चमचाच्या मागील बाजूचा वापर करावा.
  5. टोमॅटो मऊ होऊ लागतील, 10 मिनिटाच्या आसपास शिजवावे .
  6. आंच मंद करावी, चिकनचा रस किंवा पाणी ओतावे. ते मंद आचेवर गरम करावे आणि आणखी 15 मिनिटे शिजवावे .
  7. यानंतर पॅन आचेवरून काढावा आणि थंड होऊ द्यावा. जवळपास शिजलेल्या टोमॅटोची मऊ प्युरी बनविण्यासाठी हँड ब्लेंडरचा वापर करावा.
  8. या टप्प्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सूप पातळ करून घ्यावे, किंवा तसेच घट्ट ठेवावे.
  9. स्टोव्ह पेटवावा , टोमॅटो सूप पुन्हा पॅनमध्ये टाकावे आणि आंच मंद करावी . मलाई घालून चांगले ढवळून घ्यावे .
  10. चवीपुरती काळी मिरी व मीठ घालावे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार सूपची चव जुळवून घेऊ शकता .
  11. तुळशीच्या पानानी सजवून गरमागरम प्यायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर