मुख्यपृष्ठ / पाककृती / बंगाली फिश फ्राय

Photo of Bengali Fish Fry by Satabdi Mukherjee at BetterButter
6298
98
5.0(0)
0

बंगाली फिश फ्राय

Dec-07-2016
Satabdi Mukherjee
120 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बंगाली फिश फ्राय कृती बद्दल

बंगाली असल्यामुळे आम्ही फिशवर खूप प्रेम करतो आणि त्याचे विविध प्रकार बनवितो. हे फिश फ्राय नेहमीच्या फिश फ्रायसारखे नाही. बंगाली फिश फ्राय ही भूक वाढविणारा आणि नाश्त्याचा प्रकार आहे जो मॅरीनेट आणि तुकड्यावर आवरण केल्यावर तेलात तळला जाणारा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • वेस्ट  बंगाल
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 4

  1. बेटकी किंवा सालमन किंवा बासा किंवा कोणत्याही पांढर्‍या रंगाच्या फिशचे काटाविरहित मांस - 4 मोठ्या आकाराचे
  2. कांद्याची पेस्ट - 1 टी स्पून
  3. आल्ल्याची पेस्ट - 1 टी स्पून
  4. हिरवी पेस्ट - 1 टी स्पून
  5. कोथिंबीरीची पेस्ट - 1/4 कप
  6. लिंबाचा रस - 1 टेबल स्पून
  7. मिरी पावडर - 1/2 टी स्पून
  8. चवीनुसार मीठ
  9. अंडे - 1 नग
  10. मक्याचे पीठ - 1/2 कप
  11. ब्रेड क्रम्बज - 1/2 कप
  12. वाढण्यासाठी लिंबूचे तुकडे
  13. एक चिमुट काळे मीठ
  14. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. पहिल्यांदा फिशच्या मासांचे तुकडे पाण्याने धुवून घेऊ. किचन टॉवेलने पुसून कोरडे करून घेऊ.
  2. फिशच्या मांसाला कांद्याची पेस्ट, आल्ले पेस्ट, लसूण पेस्ट, लिंबाचा रस, हिरव्या मिरचीची पेस्ट, कोथिंबीरीची पेस्ट आणि मीठ एकत्र करून मॅरीनेट करावे.
  3. हे 1 1/2 तास फ्रीजमध्ये झाकून ठेवावे.
  4. 1 1/2 तासानंतर मॅरीनेट केलेले फिश फ्रीजमधून काढावे आणि बाजूला ठेवावे.
  5. अंडे फेटून घ्यावे आणि सपाट डीशमध्ये ठेवावे. मक्याचे पीठ व ब्रेड क्रम्बज फिस्ट डीशमध्ये ठेवावेत.
  6. झाकून पुन्हा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावे.
  7. खोल भांड्यात तेल पुरेसे गरम करून घ्यावे. मॅरीनेट केलेले फिशचे मांस काढून घ्यावे आणि तेलात तळून घ्यावे.
  8. तळलेले तुकडे किचन टाॅवेलवर ठेवावे आणि अतिरिक्त तेल जाऊ द्यावे.
  9. त्यावर काळे मीठ पसरून लिंबाच्या फोडीसोबत खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर