मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचं पन्ह

Photo of Kairich panh by Aarti Nijapkar at BetterButter
539
6
0.0(0)
0

कैरीचं पन्ह

Feb-20-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचं पन्ह कृती बद्दल

कैरीचं पन्ह म्हणजे वाह क्या बात है उन्हाळ्यात ह्याची मजा काय निराळीच असते मन अगदी तृप्त होऊन जातं चला तर बघुयात आपण आपल्या सर्वांचा आवडता पेय कैरीचं पन्ह

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. कच्च्या कैर्‍या  ३ ते ४ (२ वाट्या गर)
  2. गूळ  १ वाटी
  3. साखर १/२ वाटी
  4. मीठ  १ लहान चमचा
  5. वेलची पूड १ लहान चमचा  (आवडीप्रमाणे)
  6. काळं मीठ
  7. बर्फ चूरा किंवा तुकडे
  8. पाणी
  9. लिंबू आणि पुदिन्याची पाने सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम कैर्‍या  कुकरच्या भांड्यात ठेवून उकडून घ्या (३ ते ४ शिट्या). थंड झाल्यावर त्यांची सालं आणि कोय काढून केवळ गर बाजूला काढून घ्या.
  2. कैरीचा गर, गूळ व साखर, मीठ आणि वेलची पूड एकत्र मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्या. मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन घ्या . त्यात साधारण आर्धी वाटी पाणी घालून पुन्हा वाटा. 
  3. पन्हं बनवायचं असेल तेव्हा या मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार थंड पाणी व १ ते २ बर्फाचे तुकडे व काळ मीठ एकत्र करा आणि थंडगार पन्हं सर्व्ह करा.
  4. लिंबाचा रिंग व पुदिना च्या पानांनी सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर