Home / Recipes / Masala Udadvadi

Photo of Masala Udadvadi by Vaishali Joshi at BetterButter
387
3
0.0(0)
0

Masala Udadvadi

Feb-11-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. वड्या साठी साहित्य : २ कप भिजलेली उडदा ची डाळ
  2. १/२ चमचा सुंठ पावडर
  3. २ लाल मिरच्या
  4. १/२ चमचा मिरे
  5. १/२ चमचा जीर
  6. १/४ चमचा हिंग
  7. रस्सा करण्य़ासाठी : १ पांढ़रा कांदा
  8. १० -१२ काजू
  9. १/४ कप मगज बी
  10. ३ -४ हिरव्या वेलच्या
  11. २ तेज पान
  12. २ चमचे खोबरा किस
  13. १ चमचा खसखस
  14. २ हिरव्या मिरच्या
  15. १/२ चमचा जीर
  16. ७-८ लसुण पाकळ्य़ा
  17. १ इंच आल
  18. १/४ कप किसमिस
  19. १ चमचा भाजलेली कणीक
  20. १ कप दूध
  21. २-३ चमचे साखर
  22. तेल
  23. तिखट
  24. मीठ
  25. हळद

Instructions

  1. ५ तास उडद डाळ भिजत घाला
  2. पाण्य़ातुन काढून मिक्सर मधे जाडसर वाटून घ्या (पाणी न टाकता ,दरदरी )
  3. भांड्यात काढून त्यात कोथिमबिर ,जाडसर कुटलेले मिरे , जीरे , लाल मिर्ची हातानी चूरडून (चिली फ्लेक्क्स )सुंठ पावडर ,हिंग आणि मीठ घालून मिक्स करुन छोटे छोटे गोळे करून ताटलित ठेवा
  4. एका गंजात पाणी उक़ळत ठेवा पाणी उकळायला लागले की त्यात एक एक करून केलेले गोळे टाका .शिजल्या वर ते तरंगतिल तेव्हा बाहेर काढून घ्या
  5. गार झाले की गोळे थोड़े चपटे करून श्यालो फ्राय करा ( कड़क होउ देऊ नये . सॉफ्ट हवे आणि रंग पण बदलायला नको .फ़क्त कच्चट पणा जायला हवय )
  6. आता मसाला करू : मगज ,काजू ,खसखस आणि खोबर ३-४ तास भिजवून ठेवा .
  7. कांदा , मिर्ची , जीर , काजू ,मगज ,खसखस , खोबर आल , लसूण मिक्सर मधे बारीक़ वाटुन घ्या
  8. कढईत तेल गरम व्हायला ठेवा ,तापल की तेज पान आणि वेलच्या टाका , वाटलेला मसला घालून थोडा गुलाबी रंगावर होऊ द्या किसमिस टाका ,परतून घ्या
  9. दुधात भाजलेली कणिक आणि साखर मिक्स करून तो घोळ घाला परतून घेउन तिखट ,चिमुटभर ह्ळ्द घालून परता
  10. पाणी टाका मीठ टाका एक वाफ़ येउ द्या
  11. शालो फ्राय केलेले वडे टाकून ३-4 मिनिट शिजू द्या
  12. खाली उतरवून कोथींबिर घालून गारनीश करा सर्विंग साठी तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE