Home / Recipes / Stuff tomato curry

Photo of Stuff tomato curry by Rohini Rathi at BetterButter
1040
5
0.0(0)
0

Stuff tomato curry

Feb-11-2018
Rohini Rathi
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Blending
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. टोमॅटो 5 मध्यम आकाराचे
  2. आतील सारण भरण्यासाठी
  3. उकडलेले बटाटे दोन
  4. किसलेले पनीर अर्धा कप
  5. हिरवी मिरची बारीक चिरलेली दोन ते तीन
  6. चाट मसाला एक टेबलस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. ग्रेव्ही बनवण्यासाठी
  9. कांदा 1
  10. टोमॅटो एक
  11. लसणाच्या पाकळ्या चार ते पाच
  12. हरभरा दाळ दोन टेबल स्पून
  13. शेंगदाणे पाव कप
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल दोन टेबल स्पून
  16. लाल मिरची पावडर एक टेबलस्पून
  17. गरम मसाला एक टिस्पून
  18. हळदी पावडर अर्धा टीस्पून
  19. कस्तुरी मेथी एक टेबल स्पून
  20. हिंग
  21. मोहरी एक टिस्पून
  22. जिरे अर्धा टीस्पून

Instructions

  1. सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन वरील भाग कापून आतील सर्व गाळ काढून घ्यावा
  2. स्टफिंग साठी किसलेला पनीर उकडलेला बटाटा चाट मसाला बारीक चिरलेली हिरवी मिरची मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व टोमॅटोमध्ये स्टाफ करून घ्यावे
  3. ग्रेव्हीसाठी कढईत अर्धा टीस्पून तेल गरम करून त्यात जिरे घालून चिरलेला कांदा हरभऱ्याची डाळ कस्तुरी मेथी व शेंगदाणे लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यावे
  4. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  5. कढईत तेल गरम करुन जीरे मोहरीची फोडणी घालून तयार बारीक वाटलेले मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  6. नंतर त्यात लाल मिरची पावडर गरम मसाला हळद पावडर घालून मिश्रण परतून घ्यावे
  7. शेवटी भरलेले टोमॅटो घालून पाच मिनिटांपर्यंत उकळी येईपर्यंत शिजवून घ्यावे
  8. मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे शिजू द्यावे
  9. अशाप्रकारे स्टॉप टोमॅटो करी पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE