Home / Recipes / Dahi wada

Photo of Dahi wada by Ajinkya Shende at BetterButter
579
7
0.0(0)
0

Dahi wada

Feb-23-2018
Ajinkya Shende
360 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. सफेद उडिद डाळ दिड वाटी(४ तास भीजवलेली)
  2. आलं व हिरवी मिर्ची
  3. दही अर्धा किलो
  4. फोडणीसाठी तेल,जीरं,कधीपत्ता,सुक्या लाल मिरच्या २
  5. साखर आवडीनुसार(अर्धी वाटी)
  6. मीठ चवीनुसार
  7. काळ मीठ पाव चमचा
  8. भाजलेल्या जीऱ्याची पावडर
  9. लाल मिर्ची पावडर
  10. चाट मसाला
  11. कोथिम्बीर

Instructions

  1. प्रथम भीजवलेली उडिद डाळ आलं व हिरवी मिर्ची टाकून मिक्सर मधे वाटून घ्यावी.
  2. नंतर मीठ टाकून हे मिश्रण ५-७ मिनिट एकाचं बाजूने फेटुन घ्यावे.
  3. नंतर एका बाऊल मधे गरम पाण्यात चीमुठभर हींग व थोडं मीठ टाकून बाजुला ठेवावे.
  4. नंतर ह्याचे हवे त्या आकाराचे गोल वडे तळून घ्यावे.(वडे बनवताना हातला थोडं पाणी लावावं त्यामुळे हे उडिद डाळीचं मिश्रण हाताला चिटकत नाही)
  5. नंतर हे वडे ३-४ मिनिट हींगाच्या पाण्यात भीजवुन नंतर वडयातील पाणी वडे हाताने दाबून काढून टाकावे.
  6. नंतर एका बाऊल मधे दही घेवून त्यात साखर,थोडं मीठ,थोडा चाट मसाला,थोडं काळ मीठ व थोडं पाणी टाकून दही फेटुन स्मूथ करुन घ्यावे.
  7. नंतर एका पॅन मधे २ चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात जीरं,सुकी लाल मिर्ची व कधीपत्ता टाकून फिडणी करुन ही फोडणी दहयात टाकून दही व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
  8. नंतर एका सर्विंग बाऊल मधे २ वडे ठेवून त्यावर दही,जीरा पावडर,लाल मिर्ची पावडर,थोडा चाट मसाला टाकावा व थोडी कोथिम्बीर टाकून गार्निश करुन घ्यावे.आवडत असल्यास चिंचेची चटणी पण टाकु शकता.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE