Home / Recipes / BEETroot pulav

Photo of BEETroot pulav by Minal Sardeshpande at BetterButter
517
3
0.0(0)
0

BEETroot pulav

Mar-06-2018
Minal Sardeshpande
920 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Steaming
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. पाव की तांदूळ
  2. एक टॉमेटो
  3. दोन कांदे
  4. दहा बारा लसूण पाकळ्या
  5. दोन मध्यम बीट
  6. दहा बारा फरसबी शेंगा
  7. अर्धी वाटी मटार
  8. पाव वाटी काजूगर
  9. एक चमचा गरम मसाला
  10. एक गाजर
  11. एक इंच आल्याचा तुकडा
  12. चार चमचे तूप
  13. अर्धा चमचा जीरं
  14. पाच सहा काळी मिरी
  15. एक तमालपत्र
  16. मीठ
  17. एक चमचा लाल तिखट

Instructions

  1. तांदूळ धुवून निथळत ठेवावेत
  2. बीट शिजवून घ्यावे
  3. सालं काढून तुकडे करून मिक्सरला पेस्ट करून घ्यावी.
  4. काजूगर कोमट पाण्यात भिजत घालावेत.
  5. तांदूळ थोडया तुपावर परतावेत.
  6. त्यात मीठ दुप्पट पाणी आणि अर्धी बीट पेस्ट घालून भात मोकळा शिजवून घ्यावा.
  7. कांदे चिरून घ्यावे.
  8. गाजर पेरभर लांब चपटे तुकडे करावे.
  9. फरसबी दोर काढून तिरके आवडीप्रमाणे तुकडे करावे.
  10. मटार सोलून घ्यावे.
  11. टॉमेटो चा मिक्सरला फिरवून रस काढावा.
  12. आलं लसूण वाटून घ्यावी.
  13. शिजलेला भात मोकळा करून ठेवावा.
  14. गाजर मटार फरसबी आणि काजूगर थोडे वाफवून घ्यावे.
  15. कढईत उरलेले तूप घ्यावे.
  16. त्यात जीरं, काळी मिरी आणि तमालपत्र तुकडे करून घालावं.
  17. परतून घ्यावे.
  18. त्यावर कांदा घालून परतावा
  19. त्यावर आलं लसूण घालून परतावी.
  20. थोडी परतून गरम मसाला आणि लाल तिखट घालावे.
  21. वाफवलेल्या भाज्या घालून भाज्यांपुरते मीठ घालावे.
  22. आता शिजलेला भात घालून परतावा.
  23. टोमॅटोचा रस घालून भात छान परतावा आणि एक वाफ काढावी.
  24. वाफ आली की उरलेला बीट रस घालून नीट मिक्स करावा.
  25. पाच मिनिटं झाकण ठेवून वाफ काढावी.
  26. तयार पुलाव टॉमेटो सारासोबत सर्व्ह करावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE