Home / Recipes / Veg. Cheese Momos(fried)

Photo of Veg. Cheese Momos(fried) by Ajinkya Shende at BetterButter
896
4
0.0(0)
0

Veg. Cheese Momos(fried)

Apr-07-2018
Ajinkya Shende
35 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Veg. Cheese Momos(fried) RECIPE

लहान मुलांचा अतिशय आवडता पदार्थ...

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Fusion
  • Snacks

Ingredients Serving: 4

  1. २ वाटी बारीक कापलेली कोबी.
  2. १वाटी किसलेलं गाजर.
  3. पाऊण वाटी बारीक कापलेली सिमला मिर्ची.
  4. २ क्यूब किसलेलं चीज(आवडी प्रमाणे कमी जास्त वापरु शकता)
  5. पाव चमचा काळी मीरी पावडर
  6. १ चमचा चीली सॉस
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. २ वाटी मैदा
  9. थोडं तेल
  10. चटणीसाठी-
  11. २ मध्यम आकारचे टोमॅटो.
  12. २ लहान कांदे(shallots)
  13. ४-५ सुक्या लाल मिरच्या
  14. २-३ काळी मीरी
  15. २ लवंगा
  16. चवीप्रमाणे मीठ
  17. तेल

Instructions

  1. प्रथम एका पॅन मधे 2 चमचे तेल घेवून तेल तापल्यावर त्यात लवंग,काळी मीरी व सुक्या लाल मिरच्या टाकून थोडं परतवुन घ्यावं.
  2. नंतर त्यात कांदा व टोमॅटो टाकून टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत परतवुन घ्यावे.
  3. थंड झाल्यावर त्यात मीठ टाकून मिक्सर मधे ह्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
  4. नंतर एक त्याचं पॅन मधे 2 चमचे तेल टाकून चटणी व्यवस्थित परतवुन घ्यावी.
  5. नंतर एका बाऊल मधे मैदा घेवून त्यात थोडं तेल टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावा व आवश्यकतेनुसार पाणी टाकून मैदा घट्टसर भीजवुन १५ मिनिट झाकुन ठेवावा.
  6. मैदा व्यवस्थित मुरेपर्यंत एका बाऊल मधे कोबी,गाजर,सिमला मिर्ची,मीरी पावडर,चीली सॉस,किसलेलं चीज व चवीनुसार मीठ टाकून सारण व्यवस्थित मिक्स करुन घ्यावं.
  7. नंतर मैद्याचे छोटे गोळे घेवून पूरीप्रमाणे लाटुन घ्यावे व त्यात सारण भरून हव्या त्या आकराचे मोमोज बनवून घ्यावे.
  8. नंतर एका कढई मधे तेल घेवून तेल तापल्यावर मोमोज गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत तळुन घ्यावे.
  9. तयार मोमोज टोमॅटो चटणी सोबत सर्व करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE