Home / Recipes / Homemade mava kulfi

Photo of Homemade mava kulfi by Swati Kolhe at BetterButter
1818
9
0.0(0)
0

Homemade mava kulfi

Apr-03-2018
Swati Kolhe
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Simmering
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. दूध १ लिटर
  2. मावा २५० ग्राम
  3. साखर १ कप
  4. मिक्स ड्रायफ्रूईट्स १/८ कप
  5. व्हॅनिला इसेन्स ७-८ ड्रॉप

Instructions

  1. प्रथम १ लिटर कच्चे दूध घेऊन ते जाड बुडाच्या भांड्यात गरम करण्यासाठी ठेऊन द्यावे.
  2. साधारण ५-७ मिनिट दूध उकळावे.
  3. त्यांनतर दुधात साखर घालून साखर विरघळू द्यावी.
  4. तोवर दुसरी कडे पॅनमध्ये मावा घेऊन त्यात पाणी असेल तर ते ५ मिनिट आटवून घ्यावे(टीप)
  5. मावा आटला की त्यात सुरवातीला थोडे दूध घालून दूध व मावा एकजीव करावा.
  6. नंतर उरलेले सगळे दूध घालून ८-१० मिनिट छान आटवू द्यावे.
  7. मावा मध्ये दूध घातल्यावर सतत ढवळत राहावे नाहीतर मावा खाली लागून करपू शकतो व कुल्फी करपट लागते.
  8. ड्रायफ्रूईट्सची भरड घालून २ मिनिट शिजवावे व गॅस बंद करावा.
  9. कुल्फी चे मिश्रण थंड झाले की त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा.
  10. कुल्फी मोल्ड मध्ये कुल्फी मिश्रण भरून सेट होण्यासाठी फ्रीझर मध्ये ठेऊन द्यावे.
  11. साधारण ४-५ तासात कुल्फी खाण्यास तयार होते. सकाळी कुल्फी बनवली की रात्रीशी खाण्यासाठी तयार होते.
  12. टीप:
  13. बाहेर मार्केट मध्ये मिळणार मावा घरी आणल्यावर शक्यतो त्याला ५ मिनिट फ्राय करावाच. त्यामुळे एक तर त्यातले पाणी आटते आणि मावा चांगला रवाळ होतो.
  14. आता फ्लेवर ची कुल्फी बनवण्यासाठी कुल्फी मोल्ड मध्ये भरताना थोडे कुल्फी मिश्रण भरून मध्ये गुलकंद टाकावा व वरून आणखी कुल्फी मिश्रण भरावे ही गुलकंद मावा कुल्फी झाली.
  15. दूध आटवताना केशर व पिस्ता घातला तर केशर पिस्ता कुल्फी तयार होते. केशर इसेन्स पण घातला तर छान चव येते.
  16. वेलचीपूड घातल्यास वेलची फ्लेवर ची तयार होते.
  17. फक्त काजू व वेलचीपूड घातल्यास काजूमावा कुल्फी होते.
  18. बदाम भाजून घेऊन त्याची भरड कुल्फी मध्ये घालावी (roasted almond कुल्फी) ची अप्रतिम चव लागते.
  19. कुल्फी मोल्ड नसल्यास मार्केट मध्ये साधे चहा/पाण्याचे प्लास्टिक चे कप मिळतात त्यात सुद्धा उत्तम सेट होते कुल्फी.
  20. अश्या प्रकारे पॅक करू शकता.
  21. कुल्फीच्या काड्या लाकडाच्या विकतच्या असतील तर त्या १०-१५ मिनिट उकळून मगच कुल्फी मध्ये घालाव्यात. कीड वगैरे काही असतील तर ती उकळल्यामुळे निघून जाते.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE