Home / Recipes / Moong dal shahi tukra canapes

Photo of Moong dal shahi tukra canapes by Rohini Rathi at BetterButter
608
6
0.0(0)
0

Moong dal shahi tukra canapes

May-02-2018
Rohini Rathi
300 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Moong dal shahi tukra canapes RECIPE

मुगाच्या डाळीचा हलवा आणि शाही तुकडा यांना एकत्र करून बनवलेली ही पाककृती खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Medium
  • Festive
  • Rajasthan
  • Blending
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मुग डाळ हलवा साठी
  2. मुगाची डाळ दीड कप
  3. गावरान तूप एक कप
  4. दूध अर्धा लिटर
  5. साखर दीड कप
  6. विलायची पावडर एकटी स्पून
  7. बदाम पिस्ते बारीक कापलेले
  8. शाही तुकड्यासाठी
  9. ब्रेडचे स्लाइस 4
  10. तूप तळण्यासाठी
  11. कंडेन्स मिल्क अर्धाकप कप
  12. बदाम पिस्ते तुकडे सजवण्यासाठी

Instructions

  1. मुगाची डाळ धुऊन पाणी निथळून कढईत घालून थोडीशी लाल होईपर्यंत परतून घ्यावी
  2. दाळ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक दळून पीठ बनवून घ्यावे
  3. तयार पिठामध्ये पाव कप तूप 2 टेबल-स्पून दूध घालून चाळणी मध्ये घालून रगडून चाळून घ्यावी
  4. उरलेले तूप गरम करून डाळीचे गाळून घेतलेले मिश्रण घालून कमी गॅसवर लाल होईपर्यंत परतून घ्यावी
  5. गरम दूध घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे
  6. शेवटी साखर विलायची पावडर व केशर घालून शिजवावे
  7. दहा ते बारा मिनिटे शिजवावे जोपर्यंत कढईतून खूप सुटत नाही तोपर्यंत
  8. शाही तुकड्यासाठी
  9. ब्रेडचे स्लाइस ची किनारी काढून घ्यावी
  10. कटरच्या साहाय्याने गोल आकारात कापून घ्यावी
  11. कढईत तूप गरम करून ब्रेडचे गोलाकार स्लाईसेस कुरकुरे होईपर्यंत तळून घ्यावेत.
  12. प्लेटमध्ये तळलेले ब्रेडचे स्लाईस ठेवून त्यावर ती दोन चमचे कंडेन्स मिल्क घालावे व वरती तयार मूग डाळीचा हलवा ठेवावा व वरून बदाम पिस्ताचे तुकडे घालावे.
  13. अशाप्रकारे मुगदाळ हलवा शाही तुकडा कन्यआप्स तयार आहेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE