Home / Recipes / Kabuli Chana rassa/ Curry

Photo of Kabuli Chana rassa/ Curry by Aarti Nijapkar at BetterButter
806
4
0.0(0)
0

Kabuli Chana rassa/ Curry

May-20-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kabuli Chana rassa/ Curry RECIPE

काबूळी चण्याचे अनेक प्रकारे पाककृती करतो आपण पाहूयात तर्री रस्सेदार काबूळी चना रस्सा

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. काबूळी चना १ वाटी
  2. लवंग २
  3. काळीमिरी २
  4. दालचिनी १/२ इंच
  5. वेलदोडा १
  6. आलं १/२ इंच
  7. पाणी ३ ते ४ ग्लास
  8. तेल २ मोठे चमचे
  9. मोहरी १/४ लहान चमचा
  10. जिरे १/२ लहान चमचा
  11. हिंग १/२ लहान चमचा
  12. कडीपत्ते ७ ते ८ पाने
  13. कांदा पेस्ट १ लहान वाटी
  14. टमाटर पेस्ट १/२ लहान वाटी
  15. आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
  16. खोबऱ्याची पेस्ट २ मोठे चमचे
  17. कोथिंबीर पुदीना मिरची पेस्ट १ मोठा चमचा
  18. लाल तिखट १ मोठा चमचा
  19. गरम मसाला १ लहान चमचा
  20. धने पावडर १ लहान चमचा
  21. जिरे पावडर १ लहान पावडर
  22. हळद १/२ लहान चमचा
  23. मीठ चवीनुसार
  24. कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा

Instructions

  1. काबूळी चना ४ ते ५ तास भिजवून घ्या मग पाण्याने धुवून त्यात लवंग , काळीमिरी , दालचिनी , वेलदोडा, आणि आले घाला त्यात पाणी घालून ४ ते ५ कुकर मध्ये शिट्या होऊ द्या शिकवून घ्या
  2. एक पातेल्यात तेल तापवून घ्या त्यात मोहरी जिरे कडीपत्ता घाला तडतडले की हिंग घाला
  3. आता कांद्याची पेस्ट घाला व परतवून घ्या टमाटर पेस्ट , कोथिंबीर पेस्ट , आलं लसूण पेस्ट मीठ व हळद घालून व्यवस्थित तेलात भाजून घ्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत भाजा
  4. मग खोबऱ्याची पेस्ट घालून परतवून घ्या
  5. आता सर्व मसाले घाला व परतवून घ्या मसल्याना तेल सुटले पाहिजे
  6. शिजवलेले काबूळी चने घालून परतवून घ्या
  7. शिजवलेले काबूळी चण्यातील पाणी घाला हवं असेल तर गरजेनुसार अजून पाणी घालू शकता
  8. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या मीठ तिखट चव चाखून बघा आणि २ ते ३ उकळी येऊ द्या
  9. गरमागरम काबूळी चने रस्सा तयार आहे चिरलेली कोथिंबीर घाला व गॅस बंद करा चपाती , भाकरी , भात , पावासोबत खाऊ शकता
  10. लाल तरीदार रस्सा हवा असेल तर पाणी गरम घालावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE